शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. मणिपूर विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (13:24 IST)

11 कोटी शेतकऱ्यांना 6000 नव्हे तर 8000 रुपये देणार

smirti irani
Manipur Election 2022 मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत म्हणून सर्व पक्ष प्रचारात गुंतले आहेत. दरम्यान 18 फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी इंफाळमध्ये भाजपचा प्रचार केला. त्यांनी एका कार्यक्रमात पारंपारिक नृत्य देखील केले.
 
येथील जनतेला भाजपला मत देण्याचे आवाहन करताना स्मृती इराणी म्हणाल्या की, मणिपूरमध्ये गेल्या 5  वर्षांत मोठा बदल झाला आहे. त्या म्हणाल्या की राज्याने गेल्या 5 वर्षात अस्थिरतेकडून स्थिरतेकडे विकासाची मोठी झेप घेतली आहे.
 
यावेळी  त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटले की राहुल गांधींच्या कुटुंबाने मणिपूरचा एटीएम म्हणून वापर केला आहे मात्र पीएम मोदींनी त्यांच्या राजवटीत किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेमुळे 11 कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. आमचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास आम्ही मणिपूरच्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 2000 रुपये देऊ.
 
अलीकडेच निवडणूक आयोगाने मणिपूरमध्ये दोन टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांमध्ये फेरबदल करण्यात आले होते. यासह आता राज्यात 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे.