1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: करमाळा , बुधवार, 21 सप्टेंबर 2016 (14:42 IST)

सोशल मीडियात अन् गावागावात मोर्चाचीच चर्चा

सोलापूर येथील सकल मराठा मोर्चाच्या अनुषंगाने गावागावात केवळ मोर्चाच्याच चर्चा रंगात आल्या आहेत. याशिवाय सोशल मीडियातही मोर्चाच्या विषयानेच रंग भरल्याचे दिसून येत आहे.
 
कोपर्डी प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर मराठा बांधवांच्यावतीने जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. या अनुषंगानेच सोलापूर येथे बुधवार, 21 सप्टेंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चाच्या निमित्ताने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले असून प्रत्येक गावातून मराठा समाज बांधव मोठय़ा संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहेत. तालुक्यातील सर्वच गावातून व वाडय़ा-व स्त्यांवरुन नागरिकांनी मोर्चाला जाण्याचे नियोजन केले आहे. महाविद्यालयीन युवती व महिलाही या मोर्चात सामील होणार असून सद्यस्थितीत तालुक्यातील प्रत्येक गावागावात केवळ आणि केवळ सकल मराठा मोर्चाचीच चर्चा सुरु असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
 
दरम्यान सदर मोर्चाबाबत युवा वर्गात प्रचंड उत्सुकता पसरलेली असून समाजाच्या विविध मागण्यांसाठी युवा वर्ग मोठय़ाप्रमाणात आग्रही बनला आहे. अशा स्थितीत या मोर्चाचे पडसाद सोशल मीडियातही जाणवत आहेत. व्हॉट्सअँप, फेसबूक आदी ठिकाणी सकल मराठा मोर्चाचा विषय मोठय़ाप्रमाणात हाताळला जात आहे. सोलापूर मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर व्हॉट्सअँप, फेसबुक वापरणार्‍या बहुतांशी मराठा बांधवांनी आपले प्रोफाइल पिक्चर हे एक मराठा, लाख मराठा, सोलापूर मराठा क्रांती मोर्चा असा उल्लेख असलेले मोर्चाचे स्टीकर ठेवले आहे. याशिवाय बहुतांशी ग्रुपचे आयकॉनही मोर्चासंबंधी फोटो असून विविध ग्रुपवर सकल मराठा मोर्चा या विषयावरच चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.