शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Updated : सोमवार, 22 जानेवारी 2024 (13:23 IST)

तसे झाले तर मराठा आरक्षण टिकणार नाही; मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange
मातोरी, बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे असंख्य मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मातोरी गावात मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्या मुलांच्या नरडीचा घोट घ्यायला निघाले तर, तुमचं राजकीय अस्तित्व संपवायला मराठ्यांना वेळ लागणार नाही, असा इशारा त्यांनी लोकप्रतिनिधींना दिला.
 
५४ लाख नोंदी मिळाल्या आहेत. सुप्रीम कोर्टातील आरक्षण आम्ही काही नाकारले नाही. पण, ते टिकले नाही. क्युरेटिव्ह पीटिशन ही चेंबरमध्ये होते. ओपन कोर्टात होत नाही. तसे झाले तर आरक्षण टिकणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
 
आंदोलनाला डाग लागू देऊ नका:
 
मातोरी गावातून महाराष्ट्राच्या मराठा समाजाला विनंती आहे. सरकारला विनंती करणे आता बंद केले. जितक्या वेळेस करायच्या तितक्या करून झाल्या. आपल्या आंदोलनाला डाग नाही लागलं पाहिजे. मराठा जातीला डाग न लागू देण्याची जबाबदारी तुमची आहे. ५ ते १० फूट अंतर ठेवून चला. दुस-या गाडीला पास होण्यासाठी जागा द्या. आपल्याला घ्यायला दुसरं गाव आलं तर त्यांना पुतळ्याच्या पुढे जाऊ द्या. स्वयंसेवक म्हणून काम करायचं हे मी आधीच सांगितलं आहे, याची आठवण देखील मनोज जरांगे यांनी या आरक्षण दिंडीत सामिल झालेल्या सर्वांना करून दिली.