सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (12:13 IST)

आजपासून मनोज जरांगेंचं आमरण उपोषण सुरु

manoj jarange
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी  मनोज जरांगे यांनी लढा दिला. त्यांनी आमरण उपोषण केले. कुणबी नोंदी सापडलेल्यानां प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच मराठा आरक्षण लागू व्हावे या साठी मनोज जरांगे पाटील आज पासून पुन्हा आमरण उपोषण करत आहे. राज्य सरकार ने मराठा आरक्षण देण्याबाबत अध्यादेश जारी केले असून त्याची परत जरांगे यांना देण्यात आली आहे. अध्यादेश लागू होण्यासाठी तसेच सांगे सोयरेंची स्पष्टता होण्यासाठी आज पासून मनोज जरांगे हे पुन्हा आमरण उपयोधनावर आंतरवाली सराटी येथे उपोषण करण्यात आले आहे. जरांगे याची उपोषणाची ही चौथी वेळ आहे.

मराठा  आरक्षणासाठी राज्य सरकारने दिलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी ही मागणी घेऊन मनोज जरांगे आज पासून पुन्हा उपोषणाला बसले असून आता मी माघार घेणार नाही असे मनोज जरांगे  यांनी सांगितले. मी सरकारला आधीच जाहीर केलं होत. 
सगेसोयरेचा कायदा पारित व्हावा ही  मागणी करत त्यांनी सकाळी 10 वाजे पासून आमरण उपोषणाला बसले आहे. हे उपोषण आंतरवली सराटी येथे असणार आहे.  

या पूर्वी मराठा आरक्षणाची मागणी घेऊन त्यांनी 9 ऑगस्ट रोजी उपोषण केलं होत हे उपोषण 17 दिवस सुरु होतं नंतर 25 ऑक्टोबर ला दुसऱ्यांदा उपोषण केलं ते आठ दिवस चालले त्यात राज्य सरकार कसून दोन महिन्याचन्ह वेळ मागितला नंतर मुंबईत जाऊन आंदोलन करण्यासाठी ते पायी  निघाले त्यासाठी सरकारने नोंदी मिळालेल्यांना तात्काळ प्रमाण पत्र देण्याची अधिसूचना काढली. परंतु सग्यासोयराच्या बाबतीत अजून काहीही समजू शकले नाही. यासाठी मनोज जरांगे आजपासून उपोषणावर आहे. 
 
 Edited by - Priya Dixit