सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (10:46 IST)

मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटील आज पासून आमरण उपोषणाला बसणार

maratha aarakshan manoj
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 ऑक्टोबर रोजी संपले  आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न गंभीर आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाबाबत प्रतिबद्धता सांगितली आहे. त्यांनी मराठा आरक्षण देणारच, असे म्हटले आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे आहोत. असे म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटम संपले असून आज सकाळी 11 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली असून सरकारला 40 दिवसांची मुदत दिली असून आता कोणालाही वेळ दिला जाणार नाही आता आज पासून ते जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. 
 


Edited by - Priya Dixit