शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (08:37 IST)

गद्दारांची खोक्यांची लंका जाळणार,दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल

uddhav thackeray
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिटलर, मुसोलिनी आदी कुख्यात हुकूमशहांशी तुलना करताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तुफानी टीका केली. 2014 ला आम्ही मोदींना वेड्यासारखा पाठिंबा दिला होता.

पण नंतर भाजपाचा सत्तांध, पाशवी चेहरा समोर आला. रावणही शिवभक्त होता, तरीही रामाला त्याला मारावे लागले. कारण रावण माजला होता. त्याचप्रमाणे आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न झाला.
आपला धनुष्यबाणही चोरला. पण आपल्याकडे मशाल आहे. मारुतीरायाने रावणाची सोन्याची लंका दहन केली होती. तशी येणा-या निवडणुकीत या गद्दारांची खोक्यांची लंका दहन करणार म्हणजे करणार, असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.
 
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी समजूतदारपणे आंदोलन केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देताना भाजपापासून सावध राहा, असा इशाराही त्यांनी दिला. आरक्षण नक्की मिळेल पण माझी हात जोडून विनंती आहे की, भावांनो आत्महत्या करू नका. आरक्षण नक्की मिळेल, पण तेव्हा तुम्ही नसाल तर तुमच्या कुटुंबाचे रक्षण कोण करेल, असा सवालही त्यांनी केला.
 
मागच्या वर्षी शिवसेनेची दोन शकले झाल्यापासून दोन्ही गटांचे स्वतंत्र मेळावे होत आहेत. आज ठाकरे गटाचा नेहमीप्राणेच शिवाजी पार्क मैदानावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर झाला. शिवाजी पार्क येथे झालेल्या मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर व प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor