गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (14:56 IST)

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मोठ्या आंदोलनाच्या तयारी

marathi kranti
सरकारने लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी त्याचप्रमाणे मराठा आरक्षण कधीपर्यंत मिळेल याचा टाईम बॉण्ड द्यावा अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मोठ्या आंदोलनाच्या तयारी करून राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे बाबासाहेब पाटील यांनी दिला आहे.
 
बाबासाहेब पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणातील 2014 व 2019 मधील विद्यार्थ्यांना अधिसंख्य पद निर्माण करून सात 2014 पासूनचा 7 वर्षाचा संघर्ष संपवला. मराठा समाजातील 1064 मुलांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठा समाजाच्या वतीने आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या वतीने शिंदे फडणवीस सरकारचे त्याचप्रमाणे शासनाचे मनःपूर्वक आभारी आहोत. मराठा आरक्षण बाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे. कशा प्रकारे निर्णय येणार ते देखील बघायला लागेल.रिपीटीशन बाबत योग्य निर्णय आल्यास कशा प्रकारे आरक्षण सरकार देणार कसे निर्णय घेतील सर्व बाबी तपासावे लागेल आणि सरकार दरबारी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Edited by : Ratnadeep Ranshoor