शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: रविवार, 30 मे 2021 (10:03 IST)

संभाजीराजे आमचेच खासदार'- गिरीश महाजन

मराठा आरक्षणप्रकरणी भारतीय जनता पक्ष कुठेच कमी पडला नाही, याची संभाजीराजे यांना कल्पना आहे. फक्त सरकार बदलल्यानेच सुप्रीम कोर्टात बाजू नीट मांडली गेली नाही. संभाजीराजे यांनी याबाबत 6 जूनची मुदत दिली आहे. ते आमचेच खासदार आहेत. त्यामुळे ते कोणता निर्णय घेतात, हे 7 तारखेनंतर बघू, अशी प्रतिक्रिया माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे.
शनिवारी माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी वरील वक्तव्य केलं.
 
ते म्हणाले, "मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आपली बाजू योग्यरीत्या न मांडल्यामुळे आरक्षण गेलं. त्याला आधीचं भाजप सरकार किंवा आताचं केंद्र सरकार जबाबदार आहे, असं बिलकुल म्हणता येणार नाही.
 
"देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय व्यवस्थितपणे सर्व बाजूंची पूर्तता करून हे आरक्षण दिलं होतं. मात्र वकील बाजू मांडायला कमी पडले. तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे एकमेकांमध्ये वादविवाद, मतभिन्नता आहेत. आरक्षण नको, असं मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांचं म्हणणं आहे."
संभाजीराजे काय म्हणत आहेत, ते 7 तारखेनंतर बघू. ते तर आमचेच खासदार आहेत. त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. भाजप कुठेच कमी पडला नाही, हे त्यांना माहीत आहे. फक्त दुर्दैवाने सरकार बदललं आणि सुप्रीम कोर्टात बाजू लंगडी पडली. त्यामुळे आरक्षण नाकारण्यात आलं, असं महाजन म्हणाले.