सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: शनिवार, 11 डिसेंबर 2021 (15:59 IST)

दत्त आरती - आरती ओवाळूं अनसूया ।

आरती ओवाळूं अनसूया । तनय दत्तात्रेया ॥धृ.॥
सर्वांतरिंचे जें निजगुजसाक्षि भूतचि तेज । संसार वृक्षांचे आदि बीज । तो हा सद्‌गुरुराज । विरज ब्रह्मजया म्हणती तया ॥ श्रीगुरु दत्तात्रेया ॥१॥
सात्त्विक ह्रदय हे आरती । निज कर्माच्या वाती । विवेक स्नेहानें त्या निगुती । भिजवुनि ज्ञानज्योति पाजळुनि पेटविल्या । ओवाळल्या श्रीगुरु दत्तात्रेया ॥२॥
आरती उजळीता ह्या चित्ता । मध्यें तिळभर ध्वांता । वावहि नच मिळतां दृश्यता । आलि निमेषण जातां । सोहं प्रकाश हा हो सखया । श्रीगुरु दत्तात्रेया ॥३॥
प्रकाश आरतीचा हा थोर । सबाह्य अभ्यंतर । मी-तूं-पण हाचि अंधकार । जाळुनि झळके फार । वेगळा वासुदेव तेथुनियां । नोहे दत्तात्रेया ॥४॥ आरती ओवाळूं०॥