मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By

श्री दत्ताची आरती

दत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ । जनार्दन स्वामी एकनाथ ॥
हीं नामें जे जपती त्यांसी साधे निजस्वार्थ ॥ धृ. ॥
 
अनन्यभावें अखंड जे कां भजती निजभक्त । जे कां भजती निजभक्त ॥
भक्ति देउनि दत्त तयांसी करी सहज मुक्त ॥ दत्ता. ॥ १ ॥
 
ठाकुरदासा अनाथ जाणुनि करितो सनाथ । जाणुनि करितो सनाथ ॥
एकपणे विनटला दावी सद्‌गुरू एकनाथा ॥ दत्तात्रय अवधूत जनार्दन ॥ २ ॥