शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified रविवार, 1 ऑगस्ट 2021 (10:24 IST)

||श्री भुवन सुंदराची आरती||

आरती भुवनसुंदराची,इंदिरावरा मुकुंदाची ||धृ||
पद्मसम पाद्यू गमरंगा ओंवाळणी होती भृंगा,नखमणी स्रवताहे गंगा|
जे कां त्रिविधतापभंगा,वर्तुळ गुल्फ भ्राजमाने, किंकिंनीक्कणित नाद घणघाणीत|
वाकीवर झुणित नेपुरें झनन मंदिराची, झनन ध्वनी मंदिराची ||१||
 
पितपट हाटकतप्तवर्णी कांती नितंब सुस्थानिं, नाभिची अगाध हो करणी |
विश्व जनकाची जे जननी, त्रिवलीललित उदरशोभा, कंबुगलभाल विलंबित झळाळ |
कौस्तुभ सरळ बाहु श्रीवत्स तरलमणिमरळ कंकणाची प्रीती बहुजडित कंकणाची ||२||
इंदुसम आस्य कुंदरदना अधरारुणार्क बिंबवदना, पाहतां भ्रांती पडे मदना|
 
सजलमेघाब्धि दैत्यदमना झळकत मकरकुंडलाभा, कुटील कुंतली मयूरपत्रावली|
वेष्टिले तिलक भालीं, केशरी झळाळीत कृष्ण कस्तुरीची ||३||
कल्पद्रुमातळीं मूर्ती सौदामिनी कोटी, दीप्ती गोपिगोपावली भवतीं|
त्रिविष्टप पुष्पवृष्टी करिती,मंजुळ मधुर मुरली नाद,चकित गंधर्व चकित अप्सरा|
 
सुरागीरीवरा, कर्पूरधरा रतिनें प्रेमयुक्त साची, आरती ओवाळीत साची || ४||
वृंदावनी चियें हरणी, सखे ग कृष्ण माय बहिणीं, श्रमलो भवाब्धिचे फिरनिं|
अतां मज ठाव देई चरणी, अहा हे पुण्याश्लोका, नमितो चरण शरण मी,करुणा येऊ दे विशाळपाणी|
कृष्ण नेणतें बाळ आपुलें राखीं लाज माझी, दयानिधे राखीं लाज माझी ||५ ||