प. पू. श्री. गोविंद महाराज उपळेकर यांची आरती
आरती गोविंदा । सम- पदारविंदा ॥
कृष्णदेव _ गुरू -सेवा । जी पावली देवा ।
तयी निजात्म ठेवा । दिला भक्त वरदा । आरती गोविंदा । सम_ पदारविंदा ॥ आरती गोविंदा ॥
नेति नेति वेद वदती । ती स्वरुप स्थिती । भकता लागी प्रेम दिप्ती । नित्य तुमची यशदा
आरती गोविंदा ॥ सम _ पदारविंदा ॥
आरती गोविंदा । सम - पदारविंदा ॥
कितीक जड़ मूढ । तया दाविले गूढ । ज्ञान आहे मूळ रूढ । स्थिरचरी सर्वदा ॥
आरती गोविंदा । सम - पदारविंदा ॥
जग तुम्ही ईशरुप । पाहुनिया अपरूप ।
ब्रम्ह सार अनूप । सकलानंद कंदा ।
आरती गोविंदा । सम- पदारविंदा ॥
आरती ओवाळीता । हरलीसे भव चिंता |
अंहभाव नाशविता । हा सोहाळा शुभदा ।
आरती गोविंदा । सम - पदारविंदा ॥
माया मोह दूर सरले । मन चरणी रतले ।
ब्रम्हाची प्रगटले । नित्य आनंद छंदा ।
आरती गोविंदा । सम - पदारविंदा ॥
दर्शन वा स्मरण । होता नुरे ,,मी तू,, पण ।
दिव्य ज्योती उजळण । माऊली जड - जणू मंदा ।
आरती गोविंदा । सम -पदारविंदा ॥
वर्णावया महती । होई कुंठीत मती ।
वाढलीसे भक्तीरती । प्रेमानंदा विशारदा ॥
आरती गोविंदा । सम - पदारविंदा ॥
सुबोधिनी भावार्थी । श्री कॄष्णदेव विभूती ।
हरिपाठ सांगाती । स्फुरविती निजानंदा ।
आरती गोविंदा । सम - पदारविंदा ॥
कैवल्याची सोड़ी बांधी । दूर करी जीव व्याधी ।
कळीकाळ न बाधी । मुर्त सच्चितानंदा ।
आरती गोविंदा । सम - पदारविंदा ॥
आनंदी आनंद । नच उरे मोक्ष बंध ।
बहरला ब्रह्म गंध । राम शरणा सुखदा ।
आरती गेाविंदा । सम - पदारविंदा ॥
आरती गोविंदा । सम - पदारविंदा ॥

