मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2011
Written By वेबदुनिया|

नवीन वर्ष आणि तुमचे ग्रह!

वर्ष 2011चे द्वादश राशिफल

मे
आपल्या राशीचा स्वामी मंगळ आहे. प्रथम राशी असल्याने विचारांमध्ये उत्तेजना दिसून येते. या राशीच्या व्यक्ती अत्यंत उत्साही आणि कर्तव्यदक्ष असतात, कामाच्या प्रती जबाबदारीचे भान त्यांना असते.

या राशीच्या व्यक्ती या अत्यंत स्वावलंबी आणि स्वाभीमानी असल्याने यांना अपमान सहन होत नाही. कोणीही यांना डिवचण्‍याचा प्रयत्न केल्यास ते याला योग्य ते उत्तर देतात.

साहसपूर्ण कामं करायला यांना आवडते. स्पष्ट वक्तेपणा तसेच कष्ट करण्‍याची तयारी हे या राशींच्या व्यक्तीचे मुख्‍य दोन गुण आहेत.

चालू वर्षात आपल्या राशीत गुरु बाराव्या स्थानी आहे त्यामुळे या वर्षात आपल्याला अनेक सुखद अनुभव येतील. जबाबदारी केलेले काम, एखाद्या कामाप्रती असलेली निष्ठा तसेच त्याला पूर्ण केल्याने त्याचे चांगले फळ आपल्याला‍ मिळेल.

11 मे नंतर या राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत उत्साहवर्धक तसेच प्रगतिशील कालावधी आहे. या कालावधीत आपल्या बळात वाढ होत असल्याने शत्रू तसेच विरोधकांसाठी हा कालावधी अपायकारक ठरेल.

एकंदर या वर्षात आपल्याला अनेक सुखद अनुभव येतील यात शंका नाही. ग्रहांची स्थीती आपल्याला सहकार्य करण्‍याची असल्याने या वर्षात फारसे कष्ट आपल्या वाट्याला येणार नाहीत.

या वर्षात काही ठरावीक गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष करुन चालणार नाही. आपल्या विरोधकांना कमकुवत समजून काम करु नका. उगाच कोणालाही विरोध करणे टाळा.या काळात आपल्याला नौकरीत फायदा होईल. घरात सुख-शांतता कायम राहिल. मुलं असतील तर मुलांनाही या कालावधीत चांगला योग आहे.

या वर्षात कोर्टाची पायरी टाळावी कारण 11 मे नंतर या राशींच्या व्यक्तींना कोर्टात नुकसान होण्‍याची दाट शक्यता आहे. या राशीच्या व्यक्तींनी अती भावूकपणा दाखवणे टाळावे. या वर्षात अति भावूक होण्‍याचा फटका बसण्‍याची शक्यता आहे. मारुती, शिवशंकर भगवान यांची प्रार्थना केल्याने आलेली संकट पळून जातील.

वृष
वृषभ ही रास चंद्राची अत्यंत आवडती रास आहे. या राशीच्या व्यक्ती अत्यंत तेजस्वी, बुद्धीमान असतात. लोकांना आपलंसं करणारी ही रास असून, या व्यक्तींच्या जिभेवर मध असते असं म्हणतात. आपलं काम करताना कोणत्याही व्यक्तीला न दुखावण्याचा मानस या व्यक्तींचा असतो.

अत्यंत धैयोशिल तसेच साहसी व्यक्तींची ही रास आहे. या राशीच्या व्यक्ती अत्यंत भावूक असल्याने त्यांना लवकर नैराश्य येते. दुसर्‍यांचे दु:ख त्यांना सहन होत नसल्याने त्यांना अशा प्रसंगी सांभाळणे कठीण असते. या महिन्यात आपल्याला अनेक चांगले-वाईट अनुभव येतील. कष्ट करुनही नेहमीप्रमाणे त्याचे फळ चाखण्यासाठी पुन्हा मेहनत करावी लागेल. अनेक जण तुमचे क्रेडिट घेतील.

या वर्षात शनी वर्षभरासाठी पाचव्या स्थानात असल्याने ज्यांची लग्नं रखडली आहेत, त्यांच्यासाठी हे वर्ष सुखद आहे. काही कारणांमुळे गर्व वाढल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. तेव्हा जरा सांभाळून. या वर्षात कोणतीही वस्तू खरेदी करताना जरा सावधाता बाळगने गरजेचे आहे. आर्थिक व्यवहार करताना जरा जपूनच.

विश्वासाला तडा जाणार्‍या काही गोष्टी या वर्षात घडण्‍याची शक्यता असल्याने विश्वास टाकताना शंभरवेळा विचार करावा. विद्यार्थ्यांना या महिन्यात आपले सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. जितका जास्त अभ्यास कराल तितकेच यश मिळेल हे लक्षात ठेवा.

महिलांना या वर्षात मानसिक चिंता सतावेल. सातत्याने सतर्क रहाण्याची गरज. एखादा निर्णय घेताना इतरांचीही मत जाणून घ्यावीत.
देवी आणि विष्णूची पूजा केल्याने आलेली संकटं दूर होतील. दानधर्म केल्यास या वर्षात अधिक फायदा मिळेल.

मिथु
या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती अत्यंत संयमी आणि सहकार्य करणार्‍या असतात. त्यांना‍ शिस्तीत जगणे आवडते.

एखादा जर मुद्दाम चूक करत असेल, किंवा चुकीचे आरोप करत असेल तर या राशीच्या व्यक्तींना ते सहन होत नाही. कोणाचा अपमान करणे किंवा वाद घालणे या राशींच्या व्यक्तींना आवडत नाही.

या राशींच्या व्यक्तींची आणखी एक खासियत म्हणजे या राशींच्या व्यक्तींमध्ये जितका संयम असतो तितकाच संताप आणि राग यांच्या नाकावर असतो.

या राशीचे सर्वात मोठे विरोधक म्हणजे त्यांचा निकटचे मित्र किंवा नातेवाईकच. हा वारंवार अनुभव आल्याने या राशीच्या व्यक्ती फार कमी लोकांच्या संपर्कात रहातात.

नवीन वर्षात या राशींच्या व्यक्तींना संमिश्र अनुभव मिळणार आहेत. कुटुंबात समस्या निर्माण होतील. वर्षभरात अनेक अडचणी येतील, अनेक आनंदाच्या बातम्याही मिळतील. त्यामुळे हे वर्ष कसे सरेल हे कळणारच नाही. अर्थात संपूर्ण वर्षभर चांगल्या वाईट कामांमुळे तुम्ही व्यस्त रहाल.

शनि ग्रहात असल्याने सातत्याने संकटं आणि समस्या ग्रासलेल्या असतील. मे महिना अधीक जोखमीचा जाण्‍याची शक्यता असल्याने सतर्क रहाण्‍याची गरज आहे. कोणत्याही घटनेने निराश न होता, कायम परिश्रम करत रहा, आपल्याला फळ नक्की मिळेल. गणेशाची आराधना केल्याने अनेक संकटांतून मार्ग निघेल, त्यामुळे या वर्षात गणपती बप्पांना खूश ठेवा.

कर्
या राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र नेहमीच आपली स्थीती बदलत असल्याने या राशीच्या व्यक्ती अत्यंत चंचल असतात. चंचल असल्याने या राशीच्या व्यक्तींना एखादा निर्णय घेताना अनेक अडचणी येतात, त्यामुळे आलेल्या संधी निघून जातात.

या राशींच्या व्यक्तीवर कोणत्याही वातावरणाचा चटकन प्रभाव दिसून येत असल्याने या व्यक्ती अत्यंत भावूक होतात, तर कधी कधी त्या रागीट असल्याचे जाणवते. या व्यक्ती मनात एखादी गोष्ट ठेऊन वागणार्‍या असल्याने अनेक जण या व्यक्तींपासून दूर जाणेच योग्य समजतात.

मी म्हणतो तेच योग्य अशी नेहमीच भूमिका असल्याने या व्यक्तींचा कुटुंबात फारसे जमत नाही. या व्यक्तींना ओळखणे अवघड काम आहे. या वर्षात शनीचे वर्षभर सहकार्य असल्याने कोणतीही काळजी करण्‍याची गरज नाही. गुरुही सपोर्टला असल्याने मे महिन्यानंतरचाही काळ चांगला जाईल.

या महिन्यात अनेक चांगले-वाईट अनुभव येणार असल्याने हे वर्ष चांगले जाणार आहे. मागील वर्षात रखडलेले प्रश्‍न मार्गी लागतील. मुलांसंबंधीच्या चांगल्या बातम्या आल्याने मन प्रसन्न राहील. आरोग्याची काळजी घेण्‍याची गरज आहे. मनावर तसेच जिभेवर संयम ठेवा. विनाकारण वाद टाळा. प्रवास करताना जरा जपूनच. आर्थिक दृष्टीने हे वर्ष चांगले असल्याने नौकरदार वर्गाला फायदा होईल. व्यापार करणार्‍यांसाठीही अनेक मोठे करार होण्याची शक्यता आहे.

महादेव तसेच विष्णूची उपासणा करावी. दान-धर्म करा. एखाद्या तिर्थक्षेत्री जाण्‍याचे योग असल्याने येथे गेल्यावरही पुण्यकार्य हातून घडेल.

सिं
अगदी नावाप्रमाणे रास आहे. या राशीच्या व्यक्ती अत्यंत चिकाटीने काम करणार्‍या असतात. एखादे काम हातात घेतले तर ते पूर्ण केल्यावर स्वस्थ बसायचे अशी प्रवृत्ती या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येते.

त्यांच्या निडरतेने इतर व्यक्ती त्यांच्यापासून जरा दूर रहाणेच पसंत करतात. जिद्द, चिकाटी, साहसता या बाबींमुळे समाजातही या राशीच्या व्यक्तींना महत्व असते. या राशींच्या व्यक्तींमध्ये निर्णय क्षमता असल्याने त्यांनी घेतलेले निर्णय फसण्याची शक्यता कमीच असते. या राशीच्या व्यक्ती उत्तम मार्गदर्शकही असतात.

या राशींच्या व्यक्तींना एकटेपणा सहन होत नाही. समाजात रहाण्याची त्यांची प्रवृत्ती त्यांना सतत कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेवत असते. आपल्या त्रासापेक्षा दुसर्‍याचा त्रास जास्त असल्याची समज असल्याने या राशीच्या व्यक्ती इतरांना कोणत्याही परिस्थितीत मदत करण्‍यासाठी सतत झगडताना दिसतात.

या राशीला सध्या शनीची साडेसाती असली तरी त्याचा शेवट जवळ आल्याने चांगले-वाईट अनुभव वर्षा अखेर येतील. या राशीच्या व्यक्तींनी मारुतीची उपासना करावी. दररोज घरातील ज्येष्ठांचे आशिर्वाद घेतल्याने संकट टळतील.

कन्य

या राशीच्या व्यक्ती अत्यंत शांत व संयमी असतात. संकोच त्यांच्या स्वभावातच असतो, मात्र योग्य जागी स्पष्ट मत व्यक्त करण्यासही या राशीच्या व्यक्ती धजावत नाहीत. एखादे काम हाती घेतल्यानंतर ते कसे पूर्ण होईल याचाच ते विचार करत असतात. दुसर्‍या व्यक्ती या राशीच्या व्यक्तींवर जळत असल्याने या राशीच्या व्यक्तींच्या कामात अनेक अडचणी येतात, पण यातूनही मार्ग काढण्‍याची ताकद आणि युक्ती या राशीच्या व्यक्तींमध्ये असते.

या राशीच्या व्यक्ती ताण-तणाव मात्र सहन करु शकत नाहीत. संयम नसल्याने या राशीच्या व्यक्ती पटकन चिडतात. राग आल्यावर या राशीच्या व्यक्तींचे तोंडावर नियंत्रण रहात नसल्याने आयुष्य जपलेली नाती काही क्षणात तुटण्याची शक्यता असते. या राशीच्या व्यक्ती इतरांच्या संकटात नेहमीच धावून जातात, मात्र त्यांच्यावर संकट ओढावल्यास त्यांच्या मदतीला कुणीच येत नसल्याने एखाद्या नवीन व्यक्तीवर या राशीच्या व्यक्ती कधीच चटकन विश्वास टाकत नाहीत.

या राशीत शनी असल्याने साडेसातीचे मध्य चरण सुरु आहे. वर्षभरात कोणतेही नुकसान होणार नाही यासाठी सतर्क रहा. आरोग्य समस्या सतावण्‍याची शक्यता असल्याने काळजी घेणे गरजेचे.

या वर्षात प्रतिष्ठा वाढणार असली तरी यामुळे समस्याही वाढणार आहेत. गुरुचे सहकार्य वर्षा अखेरीस मिळण्याची शक्यता आहे.
कौटुबिक समस्या वाढण्‍याची शक्यता असल्याने घरात जरा कमीच बोलावे. विद्यार्थ्यांसाठी चांगले वर्ष. अभ्यास केल्यास फायदा मिळणारच. एखादे स्वप्न पूर्ण होईल.

गृहिणींसाठी चांगले वर्ष आहे. नवीन खरेदी जोरदार आहे. घरात शक्यतो वाद टाळा. भांड्याला भांडे लागले की आवाज होतोच हे लक्षात ठेवा.

तु
या राशीच्या व्यक्ती अत्यंत तर्कसंगत असतात. स्वच्छता, शिस्त यामुळे त्यांच्यात तेज असते. या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव अत्यंत नम्र असतो.

या राशीच्या व्यक्ती अत्यंत शांत आणि संयमी असल्याने क्रोधापासून त्या दूर असतात. प्रामाणिकपणामुळे कोणतीही व्यक्ती त्यांच्यावर चटकन विश्‍वास ठेवते. लोकांच्या तुमच्याप्रती चुकीच्या धारणा असल्याने तुम्हाला त्याचा जास्त त्रास होतो. घरातील मतभेदांमुळे तुमचे मन व्यथित होते.

स्वत: कोणताही त्रास सहन करुन इतरांना मात्र सुखात ठेवण्‍याचा स्वभाव या राशीच्या व्यक्तींमध्ये असल्याने त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. या वर्षात साडेसातीचा किंचतसा त्रास जाणवण्‍याची शक्यता असली तरी चांगल्या घटनाही घडणार असल्याने फारशी काळजी करण्‍याची गरज नाही.

एकंदर या वर्षात सतर्क रहाण्‍याची गरज आहे. वर्ष चांगले असले तरी सावधान रहाण्‍याची गरज आहे. कोर्ट, कायदा याच्या कचाट्‍यात अडकणार नाहीत याची काळजी घ्यावी. कष्ट करावेच लागणार असल्याने मनाची पूर्ण तयारी ठेवा. कायदा, कोर्ट कचरी याच्या कचाट्यात अडकून पडल्याने मन उदास होण्‍याची शक्यता आहे.

अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करण्‍याचा प्रयत्न मुळीच करु नका. हा प्रकार अंगलट येण्‍याची दाट शक्यता आहे. शक्ती देवता महादेवाची आराधना करा, नित्य नियमाने शंकराची पूजा केल्यास आपले संकट टळेल.

वृ‍श्चिक
या राशीच्या व्यक्तींची खासीयत म्हणजे या राशींच्या व्यक्तींच्या स्वभावामुळेच त्यांना अधिक त्रास होत असतो. प्रामाणिकपणा, स्पष्टपणा,अशा स्वभावगुणांमुळे या राशीच्या व्यक्तींचे इतरांशी फारसे पटत नाही.

खरेदी करतानाही या राशीच्या व्यक्ती दहावेळा विचार करतील. जी वस्तू आणण्‍यास या राशीच्या व्यक्ती जातात, ती सोडून दुसरीच एखादी वस्तू आणण्‍याची त्यांची खासियत असते. या राशीचे विद्यार्थी अत्यंत हुशार असतात. आपल्या पुढे जर कुणी जात असेल तर त्यांना ते पटत नाही. किमान त्याला नमवण्‍यासाठी का होईना पण या राशीचे विद्यार्थी कसून सराव करत पहिला नंबर पटकावतात.

या राशीच्या व्यक्तींमध्ये सतत कुणल्याना कुठल्या विषयाचा विचार सुरुच असतो. जिद्दीने प्रत्येक काम पूर्ण करण्‍याची त्यांची सवय असते. अतिशिस्त असल्याने कुटुंबात फारशा व्यक्तींसोबत त्यांचे जमत नाही.

आपण काय करणार, हे ते कुणालाच सांगत नाहीत. प्रत्यक्ष कृती करण्‍यावर या राशींच्या व्यक्तींचा भर असतो. मारुती, शिव शंकराची पूजा करत रहा. सर्व संकटं दूर होतील.मंत्रोत्चाराने घर पवित्र राहिल.

धन

या राशीचा स्वामी गुरु आहे. ज्ञान, आदर, संमय या गुणांची प्राप्ती गुरुच्या माध्यमातूनच होत असल्याने या राशींच्या व्यक्तींमध्ये हा गुण दिसून येतो. या राशीच्या व्यक्तींच्या विचारात सातत्याने बदल होत असतात. स्वत:चे विचार इतरांसमोर न मांडता ते गुप्त ठेवणे, एखाद्या घटनेचा धुर्तपणे विचार करणे अशा काही सवयीही या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात.

या राशींच्या व्यक्तींमध्ये अंतर्गत राग खूप अधिक असतो. स्वत:ला मनस्ताप करुन घेण्‍याची सवय असल्याने या राशीच्या व्यक्तींमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण अधिक दिसून येते. स्वातंत्र्य, न्याय, आणि स्वत:चाच निर्णय योग्य वाटत असल्याने इतर व्यक्तींशी जुळवून घेण्‍यात यांना अडचण येते.

नवीन वर्ष आपल्याला फलदायी असले तरी काही कालावधीत संकटांचा सामना करावाच लागणार असल्याचे चित्र आहे. आलेल्या परिस्थितीला तोंड देताना योग्य निर्णय घ्यावेत. प्रगती, यश, प्रतिष्ठा या गोष्टी या महिन्यात भरपूर मिळणार आहेत.

आत्मविश्वा वाढवणारा महिना असल्याने अनेक कामं मार्गी लागतील. विवाह जुळून येतील.मंगल कार्य घडतील.

मक
या राशीचा स्वामी शनी आहे. या राशीच्या व्यक्ती अत्यंत निराळ्या असतात. या राशींच्या व्यक्तींचा कामाचा मुख्‍य आधारच यांचा विचार असतो. अत्यंत सृजनशील असा स्वभाव असल्याने या व्यक्ती निर्णय घेण्यात सक्षम असतात. पराक्रम अर्थात कोणतेही साहस करण्‍याची प्रवृत्ती या राशींच्या व्यक्तींमध्ये असल्याने त्यांना नेहमीच कष्टाचे फळ मिळतेच.

दुसर्‍यांकडून आपल्याला योग्य तो मान मिळत नसल्याची जाणीव या व्यक्तींमध्ये सातत्याने असल्याने या व्यक्ती उदास असतात. आपल्या कार्याचे योग्य मुल्यांकन होत नसल्याचे त्यांना वाटत असते. आळस झटकून काम करण्‍याची प्रवृत्ती या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येते. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास भरपूर असतो.

या राशीच्या व्यक्ती कुटुंबासाठी काहीही करण्‍यास तयार असतात. विचार आणि जगण्‍याचे काही सिद्धांत असल्याने या राशीच्या व्यक्तींना शिस्त असते. या वर्षात आपल्याला अनेक अनुभव येतील. राहु मे महिन्यापर्यंत 11 बाराव्या स्थानावर असल्याने चिंता, संकटं कायम साथ देतील.

असे असले तरी हे वर्षा या राशीच्या व्यक्तींसाठी फलदायीच ठरेल. नवीन आशा निर्माण होतील. जबाबदारी वाढेल. आर्थिक घडी पुन्हा सुरळीत होईल.विद्यार्थ्यांना फलदायी, गृहिणींना आवडीच्या वस्तूंची खरेदी करायला मिळेल. ग्रहांच्या चालीत बदल झाल्याने काही चुकाही आपल्या हातून घडणार असल्याने मोठा फटकाही आपल्याला सहन करावा लागणार आहे. मारुती तसेच शिव अर्थात महादेवाची उपासना करा.

कुंभ
शनीप्रधान राशी आहे. साहस, स्पष्टवक्तेपणा, शिस्त हे या राशीतील व्यक्तींचे मुख्‍य गुण आहेत. क्रोध, स्वावलंबी असल्याने अनेकवेळा या राशींच्ये इतरांशी खटकते. अहंपणा आणि मीपणा वगळल्यास अनेक कामं मार्गी लागू शकतात. घाई-गडबडीने निर्णय घेत असल्याने अनेकदा निर्णय फसतात.

जबाबदारी घेण्‍याची भारी हौस या राशीच्या लोकांना असते. या राशीच्या व्यक्तींना समाजात प्रतिष्ठा असते, घरात मात्र यांना फारसे महत्व दिले जात नाही. या राशीच्या व्यक्ती चटकन कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवत नाहीत. एखादे काम करत असताना त्याचा पुढचा मागचा विचार करत बसत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही अशी भूमिका असल्याने अनेकदा या राशींच्या व्यक्ती अडचणीत सापडतात.

नवीन वर्ष या राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र स्वरुपाचे असणार आहे. क्रोध, रागावर नियंत्रण ठेवल्यास आपले काम होईल हे निश्चित माना. वाद-विवाद टाळा. स्वभावात लवचिकता ठेवा. निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. मित्र, नातेवाईक हे काय म्हणतील याचा फारसा विचार न केलेलाच बरा.

महिलांसाठी चांगले वर्ष आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. रखडलेले काम मार्गी लागेल. मारुतीची उपासना करा. शनीची पुजा करा. विष्णू स्तुती केल्याने फायदा मिळेल.

मि
या राशीचा स्वामी गुरु हा आहे. या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा अत्यंत गंभीर, शांत, ‍सहिष्णू असा असतो. जबाबदारीचे भान असल्याने या व्यक्तींवर सोपवण्‍यात आलेली जबाबदारी ते योग्य पद्धतीने पार पाडतात. शंका, कुशंका यांना फाटा देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु यांचे प्रमाण मनात अधिक असल्याने निर्णय घेताना चूक होते.

मनाविरोधात एखादी घटना घडल्यावर या राशीच्या व्यक्ती जमदग्नीचा अवतार धारण करतात. एखादे काम करताना जर त्यावर टीका झाल्यास ते काम अर्धवट सोडून देण्‍याची त्यांची प्रवृत्ती असते.

मीपणा नसल्याने या राशीच्या व्यक्तींचे इतरांशी लवकर जुळून येते. मुख्‍यत: गुरु हा स्वामी ग्रह असल्याने या राशीच्या व्यक्ती या शांत, आकर्षक आणि तेजस्वी असतात. या राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष उत्तम आहे. आत्मविश्वास वाढल्याने प्रगती कराल.गृहिणींसाठीही आनंदाच्या बातम्या घेऊन येणारे हे वर्ष असणार आहे.

करियर तसेच शिक्षणात प्रगती होईल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी फायद्याचे वर्ष असणार नाही. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करा. शिव आणि विष्णूची आराधना करा. आलेली संकटं दूर जातील.एखादे पुण्य काम कराल.