मकर राशीच्या जातकांचे 2016 मधील संपूर्ण वार्षिक राशिभविष्यफल
राश्याधिपती शनी वर्षभर लाभस्थानात भ्रमण करणार आहे. मंगळही बराच काळ याच स्थानामध्ये वक्रीमार्गी स्थितीत राहत असल्यामुळे तुम्हाला तो स्वस्थता लाभू देणार नाही. भरपूर काम करण्याची तुमची इच्छा असली तरी, जूनपर्यंत गुरू अष्टमस्थानात असल्याने परिस्थितीशी मुकाबला करत तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करावे लागेल. वैयक्तिक जीवनात तुम्हाला अपेक्षित इतकी शांती आणि सुख मिळणार नाही. कुटुंबातील सदस्य आणि जोडीदारासोबत संघर्षाची शक्यता अधिक आहे, त्यामुळं कुटुंबातील वातावरण बिघडेल. यावर्षी ग्रहमान तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगत आहे. हा सल्ला पाळा अन्यथा परिणामांसाठी तयार व्हा. 2016 हे वर्ष तुमच्या प्रेम जीवनासाठी देखील अद्भुत आहे. थोडक्यात, हे वर्ष तुमच्यासाठी आजपर्यंतचं एक सर्वोत्कृष्ट वर्ष राहील.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... : सांसारिक जीवनाच्या दृष्टीने वर्ष म्हणजे तारेवरची कसरत आहे. दैनंदिन कामाचा व्याप वाढल्यामुळे घरामध्ये म्हणावे तितके लक्ष देता येणार नाही. पूर्वी ठरविलेले काही महत्त्वाचे निर्णय डिसेंबपर्यंत कार्यान्वित केले जातील. लांबच्या प्रवासाचे योग संभवतात. जानेवारी ते एप्रिल या दरम्यान नवीन जागेचे बुकिंग होईल किंवा तेथे स्थलांतर केले जाईल. या दरम्यान जुनी प्रॉपर्टी विकायचे ठरेल. एप्रिल ते जुल हा कालावधी आíथकदृष्टय़ा लाभदायक आहे. मुलांच्या गरजांकरिता पशाची तरतूद झाल्याने बरे वाटेल. जुल ते सप्टेंबपर्यंत घरामधले जुने प्रश्न नव्याने डोके वर काढतील. त्यामध्ये सर्वाचे एकमत होऊन निर्णय होणे कठीण आहे. घरामध्ये शुभकार्य ठरेल. माहोल आनंदी असेल. अपचन, डोकेदुखी, आणि मानसिक ताण तुमच्या आरोग्यावर परिणाम करतील.
धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : व्यापारी वर्गाला नवीन वर्ष जास्त कमाई करण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. जेवढे जास्त काम तेवढी जास्त कमाई असे समीकरण असेल. एप्रिलपासून जुलैपर्यंत एखादा मोठा धोका पत्करून बाजारपेठेत आपली प्रतिष्ठा वाढवाविशी वाटेल. देशात किंवा परदेशात एखादी शाखा उघडून कामाचा पसारा वाढविण्याची इच्छा असेल. जुलैपासून सप्टेंबरपर्यंत थोडासा तणावाचा काळ आहे. केलेल्या कामाचे पसे मिळण्यात अडथळे येतील. सप्टेंबरनंतर तुमचे मन शांत होईल.
नोकरदार व्यक्तींना नवीन वर्षांच्या सुरुवातीला वरिष्ठांकडून काही चांगले संकेत मिळतील. त्यामुळे त्यांना मूठभर मांस चढल्यासारखे वाटेल. जानेवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये कामाची धावपळ इतकी वाढेल की तुम्हाला नियोजन करणे कठीण होऊन बसेल. तुमच्या कामाच्या स्वरूपात बदल केला जाईल. एप्रिल ते जुल हा कालावधी तुम्हाला मोहात टाकणारा आहे. केलेल्या कामातून जादा अधिकार आणि पैसे मिळण्याची संधी मिळेल. जुल ते सप्टेंबर दरम्यान तुम्ही केलेल्या चांगल्या कामामुळे सहकाऱ्यांची असूया जाणवेल. छोटय़ा-मोठय़ा कामांकरिता परदेशात जाता येईल. सप्टेंबरनंतर सर्वाशी अदबीने वागा.
तरुण मंडळींना वर्ष प्रगतीच्या दृष्टीने उत्तम आहे. मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा त्यांनी चांगला उपयोग करून घ्यावा. नोकरी किंवा व्यवसायात स्थिरता आल्यामुळे सांसारिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल. कलाकार आणि खेळाडूंच्या गुणांना भरपूर वाव मिळेल. त्यांना केलेल्या कामाचे पशाच्या किंवा इतर स्वरूपात चांगले फळ मिळेल.