मेष : मेष राशीच्या जातकांचे आरोग्य या वर्षी उत्तम राहणार आहे. मोसमी आजारपण सोडले तर मोठे कोणतेही आजाराचे योग दिसून येत नाही पण स्वस्थ राहण्यासाठी नियमितपणे योगाभ्यास करायला पाहिजे. या वर्षी मुलाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. एखाद्या पर्वतीय पर्यटन स्थळावर गेल्याने आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : या वर्षी वृषभ राशीच्या जातकांचे आरोग्य सामान्य राहणार आहे पण अनियमित जीवनशैलीमुळे गॅस, बदहजमी इत्यादी त्रास संभवतात. गरजेचे आहे की खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि व्यायाम करणे फारच गरजेचे आहे. 11 ऑगस्ट नंतर गुरु ग्रहाचा गोचर तुमच्यासाठी शारीरिक आरोग्य देणारा असेल, पण मानसिक काळजी कायम राहील, बायकोच्या आरोग्याची काळजी राहील.
मिथुन : या वर्षी मिथुन राशीच्या जातकांचे आरोग्य सामान्य राहणार आहे. खांदे, जननांग आणि लिव्हर संबंधी काही तक्रारी राहण्याची शक्यता आहे. मोसमात बदल झाल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. खानपानावर विशेष लक्ष्य द्यावे लागणार आहे. नियमित योगा केल्याने फायदा होईल.
कर्क : वर्ष 2016मध्ये कर्क राशीच्या लोकांना आरोग्य संबंधी काही तक्रारी राहण्याची शक्यता आहे. चुकीचे खानपान किंवा फास्ट फूडच्या सवयीमुळे पोटाशी निगडित आजारांच्या आहारी जावे लागणार आहे. आरोग्य समस्यांकडे नजरअंदाज करू नये आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वस्थ जीवनशैली आणि नियमित व्यायाम करून या वर्षी तुम्ही बर्याच आजारांपासून स्वत:चा बचाव करू शकता.
सिंह : वर्ष 2016मध्ये सिंह राशीच्या जातकांचे आरोग्य उत्तम राहणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने वेळ फारच अनुकूल आहे, तुम्ही स्वत:ला हरफनमौलाच्या रूपात आत्मविश्वास व स्फूर्तीने परिपूर्ण अनुभवाल. पण या वर्षी थोड्या वेळासाठी तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे, पण हा त्रास लवकरच दूर होईल. खाण्यापिण्याकडे लक्ष्य न दिल्यामुळे लठ्ठपणा, कमरेचे दुखणे किंवा पोटाचे त्रास संभवतात. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष्य देण्याची गरज आहे.
कन्या : या वर्षी तुमचे आरोग्य काळजीचे कारण बनू शकतं. मानसिक तणाव आणि शारीरिक त्रासांमुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. पण सात्त्विक आहार आणि नियमित योगा केल्याने या त्रासांपासून सुटका मिळू शकतो. वर्षाच्या शेवटी आरोग्यात थोडे सुधार होणे सुरू होईल.
तूळ : तुला राशीच्या जातकांवर या वर्षी शनीची दशा आहे, ज्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कुठल्याही मोसमी आजारपणाला सामान्य घेऊ नका. ज्या जातकांना जुने आजार असतील त्यांनी वर्षाच्या दुसर्या भागात विशेष लक्ष्य द्यायला पाहिजे. डॉक्टरचा सल्ला घेतल्यानंतरच कुठलेही व्यायाम करावा.
वृश्चिक : या वर्षात लग्न स्थानात शनीची स्थिती आरोग्यासाठी तणावपूर्ण आहे. खानपानावर विशेष लक्ष्य देण्याची गरज आहे. शरीरात भारीपण, लठ्ठपणा किंवा चिडखोरपणाची समस्या राहू शकते. हृदय आणि पोटाशी निगडित काही तक्रार राहण्याची शक्यता आहे, पण हा त्रास थोड्या दिवसांसाठीच राहणार आहे. सप्तम भावात शनीची दृष्टी बायकोच्या आरोग्यासाठी नुकसान करणारी आहे, सावध राहा.
धनू : धनू राशीच्या जातकांना या वर्षी आपल्या आरोग्याप्रती सतर्क राहणे फारच गरजेचे आहे. पोटाचे आजारपण होण्याची शक्यता देखील आहे. या वर्षी धनू राशीच्या जातकांना आपल्या आहाराकडे विशेष लक्ष्य देण्याची गरज आहे. डोळ्यांचे सामान्य तक्रार होण्याची शक्यता आहे.
मकर : आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष मकर राशीच्या जातकांसाठी फारच उत्तम आहे. या वर्षी आरोग्याकडे अधिक लक्ष्य देण्याची गरज नाही आहे. वातावरणात बदल आणि चुकीचे खाण्यापिण्यामुळे काही लहान सहानं तक्रारी होऊ शकतात. मानसिक तणावापासून स्वत:चा बचाव करायला पाहिजे. हिरव्या भाज्यांचे सेवन जास्त केले पाहिजे.
कुंभ : ह्या वर्षी कुंभ राशीच्या जातकांचे आरोग्य उत्तम राहणार आहे. वाईट सवयी, अनियमित जीवनशैली, दारू इत्यादीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला तर वर्षभर कुठल्याही प्रकारच्या मोठ्या तक्रारी राहणार नाही. वर्षाच्या काही महिन्यांमध्ये थोडे फार त्रास संभवतात. या वर्षात जातक वाईट सवयी जसे दारू, सिगारेट सारख्या व्यसनांच्या अधीन होऊ शकतात, म्हणून सावध राहा.
मीन : या वर्षी मीन राशीच्या जातकांना आपल्या आरोग्याकडे थोडे लक्ष्य देण्याचे गरज आहे. वर्षाची सुरुवातीत आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे. या वेळेस चुकीच्या आहारामुळे आतडे, लिव्हर, किडनी, पोट किंवा रक्तजनित समस्या होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याकडे लक्ष्य दिले तर या त्रासांपासून सुटकारा होण्याची शक्यता आहे. या वर्षी मीन राशीच्या जातकांना आपल्या जीवनशैली सुधारणा केली पाहिजे.