मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 11 जानेवारी 2020 (14:51 IST)

कर्क राशीचे 2020 मधील टेरो कार्ड द्वारे भविष्य जाणून घेऊया

कर्क : कार्ड - Page of Pentacles
2020 वर्ष आपणांस बरेच बदल होणार आहे. नोकरदार वर्गासाठी बदली आणि बढतीचे योग आहे. नोकरीत बदल करणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. आपल्या कामांमध्ये आपण नवे प्रयोग करत असता त्यामुळे आपली प्रगती होऊ शकते. आपण नव्या नोकरीसाठी प्रशिक्षण घेऊ शकता. व्यवसायात गुंतवणूक करू नका. नुकसानीचे योग आहे. व्यवसायात कोणते ही जोखीम घेण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घ्या. परिस्थितीचा अध्ययन करा. व्यवसायातील भागीदार आपल्या नावाचा दुरुपयोग करू शकतो. आपली प्रगती होईल ज्यामुळे कुटुंबातील सदस्ये आनंदात असतील. ते आपल्याला मदत करतील. आपले प्रेम असल्यास आपण प्रियकर/प्रेयसीची भेट कुटुंबाशी करून द्याल. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. योग किंव्हा रेकी करा. वैवाहिकांसाठी हे वर्ष उत्तम असणार. आपसात प्रेम वाढेल. निःसंतानांना अपत्यप्राप्तीचे योग आहे. नोकरीत चांगले नाव मिळवाल. शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका. एकंदरीत हे वर्ष आपणांस संतुलित जाणार.                 .
 
करियर :- नवीन नोकरीत प्रगती होईल. आपल्याला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आपल्यासाठी आपले कौशल्य दाखविण्याचा हा उत्तम काळ आहे.
 
व्यवसाय :- व्यवसायात गुंतवणुकींपासून लांब राहा. व्यवसाय करत असल्यास भागीदारांकडे विशेष लक्ष द्या. ते आपल्या नावाचा गैरवापर करू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्याआधी संशोधन करा.
 
कुटुंब :- आपल्या केलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या कुटुंबाचा सहभाग असेल. आपल्या कुटुंबाशी आपला सुसंवाद राहील. ते आपणांस योग्य मार्गदर्शन करतील. घरात मांगलिक आणि धार्मिक कार्य होतील.
 
आरोग्य :- निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा. योग, ध्यान करा शांत राहा. हे आपणांस तणावापासून लांब ठेवतील आणि शरीराला तंदुरुस्त ठेवते. सर्दी पडसे सारखे त्रास उद्भवतील. कुठल्याही प्रकाराची ऍलर्जी असल्यास सावधगिरी बाळगा.  
 
प्रेम आणि विवाह :- विवाहितांसाठी हे वर्ष उत्तम असणार. आपल्याला जोडीदाराचे समर्थन मिळतील. आपसात प्रेम वाढेल. आपण एकमेकांना भरपूर वेळ देऊ शकाल. कौटुंबिक नियोजनाच्या विचार करणाऱ्यांना गोड बातमी मिळेल. अपत्यप्राप्तीचे योग येतील.  
 
आर्थिक स्थिती :- आपली आर्थिक स्थिती चांगली राहील. आपणांस नोकरीमध्ये बढती आणि बक्षिसे मिळतील. वेतनवाढ झाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. शेयर्समध्ये गुंतवणूक करू नका. बचतीकडे लक्ष द्या. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करू शकता.
 
टिप :- प्रेमात वाढ करण्यासाठी 'नैरृत्य दिशेस गुलाब क्वार्ट्झ ठेवा.
घरातील नैरृत्य दिशेस दुहेरी आनंदाचे प्रतीक असलेले क्रिस्टल हंसाची जोडी ठेवावी.