सोमवार, 6 ऑक्टोबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. बाबा आमटे
Written By वेबदुनिया|

उपेक्षितांचा कैवारी हरपला

--सुनिल तटकरे

उपेक्षितांचा कैवारी हरपला
MH GovtMH GOVT
समाजातील उपेक्षितांची सेवा करुन समाजात त्यांना मानाचे स्थान मिळवून देणार्‍या डॉ.बाबा आमटे यांच्या निधनाबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री सुनील तटकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

आपल्या शोक संदेशात श्री.तटकरे म्हणतात की, डॉ.बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन हेच आपले कर्तव्य मानून त्यांच्या सेवेसाठी आपले आयुष्य वेचले. त्याचबरोबर या उपेक्षितांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले.