रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. बाबा आमटे
Written By वेबदुनिया|

आनंदवनात चालविले जाणारे प्रकल्प

MH GovtMH GOVT
गोकुळ - या प्रकल्पात साठ मुले रहातात. एक तर ती अनाथ किंवा कुष्ठरोगी असतात. या मुलांची या प्रकल्पाद्वारे अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच शिक्षण, आरोग्याची काळजी वाहिली जाते.

उत्तरायण- हा ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम असून त्यात तीस लोक रहातात. त्यांची पूर्ण व्यवस्था पाहिली जाते.

स्नेह सावली- याची स्थापना १९८३ मध्ये झाली. वयोववृद्ध कुष्ठरोगी दाम्पत्यांसाठी हा प्रकल्प आहे.
सध्या तेथे १८१ दाम्पत्ये रहातात.

लोटी रामन वृद्धाश्रम- (विस्डम बॅंक)- हा प्रकल्प अभिनव आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवी ज्ञानाचा फायदा आनंदवनाला व्हावा यासाठी हा प्रकल्प चालाविला जातो.

सुख सदन- हे एक प्रकारचे कम्युन आहे. येथे बरे झालेले कुष्ठरोगी रहातात. त्याद्वारे येथे कुटुंब निर्माण केले जाते. त्याद्वारे दाम्पत्याला वयोवृद्धांची काळजी घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भारतीय कुटुंबपद्धती टिकविण्यासाठी हा प्रकल्प आहे. सध्या अशा प्रकारचे सहा कम्युन आहे. आनंदवन, त्यात अडीच हजार कुटुंबे रहातात. यात एक हजार कुष्ठरोगी व इतर रोगांनी ग्रासलेले एक हजार लोक आहेत. सुखसदनाशिवाय मुक्तीसदन, कृषी सदन, मित्रांगण ही कम्युन आहेत.

मुक्तांगण- याची स्थापना १९७४ मध्ये झाली. त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. विवाहविधी येथे संपन्न ोतो. याशिवाय येथे वाचनालय, मुलांसाठी खेळण्याची व प्राण्यांची जागा येथे आहे. १९९९ मध्ये येथे आनंदवन एम्पोरीयम सेल्स सेंटर येथे उघडण्यात आले.