जायफळाने ब्लॅकहेड्सपासून सुटका
ब्लॅकहेड्स ऑयली स्किनवर होणारी एक सामान्य समस्या आहे. हे काढण्यासाठी बाजारात अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स सापडतात पण त्यात केमिकल असल्यामुळे त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतात. यापेक्षा आपण घरगुती उपायाने ही समस्या दूर करू शकतो. चेहर्यावरील ब्लॅकहेड्सपासून जायफळाने मुक्ती मिळू शकते. यासाठी तयार करा हे स्क्रब:
2 चमचे दूध आणि सम मात्रेत जायफळ पावडर मिसळून पेस्ट तयार करा.
चेहरा स्वच्छ धुऊन सर्कुलर मोशन मध्ये ही पेस्ट चेहर्यावर लावा.
चेहर्यावर जिथे जिथे ब्लॅकहेड्स असतील त्यावर फोकस करा.
जायफळ स्क्रबने 5 मिनिट स्क्रब करा.
गार पाण्याने आपला चेहरा धुऊन बोटांनी थापडून चेहरा वाळवा.
जायफळ आपल्या चेहर्याच्या पोर्समध्ये जाऊन घाण बाहेर काढण्यात मदत करतं.
ड्राय स्किन असणार्यांनी फुल फॅट मिल्क आणि ऑयली स्किन असणार्यांनी मध वापरावे.