शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

डार्क सर्कल दूर करण्यासाठी...

डोळ्याखाली असणारे काळे वलय आपल्या सौंदर्याला ग्रहण लावत असते. हे डार्क सर्कल तणाव, थकवा, कमजोरी तसेच एलर्जीमुळे येत असतो. डार्क सर्कल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय- 

* चंदन व जैतूनचे तेल एकत्र करून डोळ्या खाली लावल्याने डार्क सर्कल कमी होतात.

* 50- 50 ग्रॅम तुळशी, ‍कडूलिंब व पुदिनाच्या पानांना बारीक वाटून लेप तयार करून घ्यावा व त्यात थोडी हळद व गुलाबपाणी घालून एकजीव करावे. हा लेप डार्क सर्कल्सवर लावल्याने आराम पडतो.

* दूधात चिमूटभर मीठ टाकून कापसाच्या बोळ्याने डार्क सर्कलवर लावाल्याने ते नाहीसे होतात.