बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 16 डिसेंबर 2020 (12:28 IST)

चेहर्‍यावर नैसर्गिक चमकसाठी गाजराचं ज्यूस दररोज प्या

गाजराचे बरेच फायदे आहेत कारण या मध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, बी 8, तांबा आणि लोह सारखे इतर खनिजे आणि व्हिटॅमिन आढळतात. गाजर हे 12 महिने सहज मिळत. आज आम्ही आपणास सांगणार आहोत गाजर खाण्याचे फायदे.
 
 
* दररोज गाजराचा सॅलड खाल्ल्याने किंवा गाजराचा ज्यूस प्यायल्यानं चेहऱ्यावर चकाकी येते. गाजर रक्तातील विषारी घटकांना कमी करत आणि ह्याच्या सेवनाने मुरूम नखे पासून सुटका होते.
* गाजरात व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात आढळते. म्हणून गाजराचे नियमितपणे सेवन केल्यानं डोळ्यांची दृष्टी वाढते.
* गाजराचा ज्यूस प्यायल्यानं शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, आणि या मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. जे शरीराच्या पचनशक्तीला वाढवते.
* गाजरामध्ये कॅरोटिनॉइड असते,जे हृदयाच्या रुग्णांसाठी चांगले असते. असे मानले जाते की गाजराचे सेवन दररोज केल्यानं हे कोलेस्ट्रॉलची पातळीला कमी करत.
* गाजराचे दररोज सेवन केल्यानं रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात राहते.
* गाजराचे सेवन केल्यानं हिरड्यांमधून रक्त येणे बंद होते आणि दातांची चमक वाढते.
* गाजरात बीटा कॅरोटीन असते आणि हे रोग प्रतिकारक शक्तीसाठी चांगले असते.
* गाजराच्या रसात खडीसाखर आणि काळीमिरी मिसळून प्यायल्याने खोकला बरा होतो आणि कफाच्या त्रासांमध्ये देखील आराम मिळतो.
* गाजर खाल्ल्याने पोट आणि फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.