शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

स्वच्छ आणि उजळ त्वचेसाठी

डागरहित आणि उजळ त्वचा ही सर्व महिलांची पहिली आवड असते. तर जाणून घ्या त्यासाठी काही सोपे उपाय:

क्लींजर- चेहरा दोनदा क्लींजरने स्वच्छ करावा. चेहर्‍यावर मेकअप मुळीच राहता कामा नये. मेकअप निघाली नाही तर चेहर्‍यावरील पोर्स भरतील आणि पुरळ होण्याचा धोका वाढेल.
 
स्क्रब- चेहर्‍यावरील डेड स्किन हटवणे आवश्यक आहे तेव्हाच चेहर्‍यावर ग्लो येईल. म्हणून प्रत्येक तीन दिवसात चेहर्‍यावर स्क्रब करा.
 
फेस पॅक- चेहर्‍यावर स्क्रब केल्यानंतर लगेच फॅस पॅक लावा. कारण स्क्रबने चेहर्‍यावरील पोर्स खुलून जातात आणि डस्ट त्यात समावू शकतात. म्हणून स्क्रब केल्यावर हळद आणि बेसनाचे फॅस पॅक लावून घ्यावे.
टोनर- टोनरने स्किनचा पीएच संतुलित राहतं. हे चेहर्‍यावरील मोठे पोर्स लहान करतं.
 
मॉइस्चराइजर- एकदा चेहरा पूर्णपणे स्वच्छ झाला की त्यावर माइल्ड मॉइस्चराइजर लावा.
 
फेस ऑयल- चेहर्‍यावर फेस ऑयल लावल्याने ग्लो येतो आणि चेहर्‍याची शुष्कता टिकली राहते. आपण आपल्या स्किन टोनच्या हिशोबाने फेस ऑयल निवडू शकता. फेस ऑयलने चेहर्‍यावरील सुरकुत्या आणि डाग मिटतात आणि चेहरा स्वच्छ दिसू लागतो.