शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

Thick Eyelashes दाट आणि सुंदर पापण्या हव्या असतील तर हे 3 घरगुती उपाय

Eyelashes
Thick Eyelashes दाट पापण्यांमुळे चेहरा अधिक आकर्षक बनतो, परंतु प्रत्येकाला दाड पापण्या नसतात, त्यामुळे ते कृत्रिम पापण्या देखील वापरतात. जर तुम्हाला तुमची पापणी नैसर्गिकरित्या वाढवायची असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय करून पाहू शकता. पापण्यांच्या वाढीसाठी खोबरेल तेल वापरता येते. याशिवाय इतरही अनेक तेले आहेत जी पापण्यांना सुंदर बनवतात-
 
एरंडेल तेल
पापण्यांच्या वाढीसाठी हे तेल खूप फायदेशीर आहे. या तेलाच्या वापराने पापण्या दाट होतात. हे तेल पापण्या पडण्यापासून रोखते. ते वापरण्यासाठी खोबरेल तेलात एक चमचा एरंडेल तेल मिसळून रोज रात्री कापसाच्या मदतीने पापण्यांवर लावा, नंतर सकाळी धुवा. अशात पापण्यांची वाढ खूप जलद होईल.
 
नारळ तेल
पापण्यांना सुंदर बनवण्यासाठी नारळाचे तेल खूप फायद्याचे ठरतं. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ऑलिव्ह ऑईल आणि खोबरेल तेल एकत्र मिक्स करून रात्री झोपण्यापूर्वी पापण्यांवर लावू शकता आणि सकाळी पाण्याने चेहरा धुवा.
 
ग्रीन टी
ग्रीन टी केवळ तुमच्या शरीरासाठीच नाही तर पापण्यांसाठीही फायदेशीर आहे. तुमच्या पापण्या जाड आणि सुंदर करण्यासाठी तुम्ही ग्रीन टी वापरू शकता. यासाठी आधी ग्रीन टी बनवा आणि नंतर थंड करा. ते तुमच्या पापण्यांवर लावा. त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल.