सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (22:37 IST)

Beauty Tips : काय सांगता, पुदिना वाढवेल चेहऱ्याचा तजेलपणा

पुदिनाचा उन्हाळ्यात वेगवेगळा वापर केला जातो.उसाच्या रसात, चटणीमध्ये,थंड बनविण्यासाठी तर कधी चहात याचा वापर केला जातो. या मध्ये अँटी बेक्टेरियल,अँटी इंफ्लामेंट्री आणि सॅलिसिलिक एसिड आढळते. या मुळे चेहऱ्यावर मुरूम होत नाही. उन्हाळ्यात आहारात याचा वापर करतात तर त्वचेसाठी देखील हे फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊ या की पुदिनाचा वापर त्वचेसाठी किंवा चेहऱ्यासाठी कसा वापरू शकतो.
 
1 फेस पॅक - पुदिनाचा फेस पॅक बनवून देखील चेहऱ्यावर लावू शकतो. याचा पॅक बनविण्यासाठी पुदिन्याची पाने वाळवून वाटून घ्या आणि गुलाबपाण्यात मिसळून लावा. 15 मिनिटाने चेहरा पाण्याने धुऊन घ्या. आठवड्यातून असे तीनदा करा. आपल्याला ताजेतवाने वाटेल.आपली इच्छा असल्यास यामध्ये टोमॅटोचा गीर देखील मिसळू शकता.    
 
2 फेस वॉश - पुदिन्याचे फेसवॉश बनवून आपण हे वापरू शकता.हे चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करतो. या साठी लिंबाचा रस,गुलाबपाणी आणि पुदिन्याचे पान भिजत ठेवा. एक तासानंतर चेहरा या पाण्याने धुऊन घ्या. जर आपली त्वचा कोरडी आहे तर आपण लिंबाच्या जागी मध वापरा.
 
3 मुरूम- जर उष्णतेमुळे चेहऱ्यावर मुरूम होत असतील तर आपण पुदिनाचा फेसपॅक लावू शकता. या साठी पुदिना पावडर मध्ये हळद आणि गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटा नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या.