बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (07:12 IST)

Asian Games: जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत भारत विजयी

Badminton
Asian Games:अमेरिकेतील स्पोकेन येथे सुरू असलेल्या जागतिक ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या मिश्र सांघिक स्पर्धेत भारताने कुक आयलंडचा 5-0 असा पराभव करून आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. मिश्र दुहेरीत सात्विक रेड्डी कानापुरम आणि वैष्णवी खडकेकर या जोडीने काईन मातायो आणि तेरेपी अकावी यांचा21-6, 21-8 असा पराभव करून भारताला सुरुवातीची आघाडी मिळवून दिली.
 
मुलांच्या एकेरीच्या सामन्यात आयुष शेट्टीने डॅनियल अकावीवर 21-6, 21-3 असा शानदार विजय नोंदवला, तर तारा शाहने ते पा ओ ते रंगी तुपाचा 21-3, 21-6 असा अवघ्या 14 मिनिटांत पराभव केला. मुलांच्या दुहेरीत निकोलस आणि तुषार यांनी इमॅन्युएला मातायो आणि काइन मातायो यांचा 21-9, 21-5 असा पराभव केला, तर मुलींच्या दुहेरीत राधिका शर्मा आणि तन्वी शर्मा यांनी तेरेपी अकावी आणि वैटिया क्रोकोम्बे अमा यांचा 21-4, 21-7 असा पराभव केला.
 




Edited by - Priya Dixit