रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (23:33 IST)

कच्च्या दुधामुळे सुरकुत्या दूर होतात, त्वचा मुलायम होते

milk
दूध हे आरोग्यासाठी चांगलं असून याचे खूप फायदे आहते. रोज दूध प्यायल्याने शरीरातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता तर दूर होतेच याने हाडे देखील मजबूत होतात. तसेच चेहऱ्यावर दूध लावण्याचे अनेक फायदे होतात. कच्चं दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहते. शिवाय सुरकुत्या घालवण्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो.
 
कच्च्या दुधामुळे त्वचेला होणारे फायदे-
सुरकुत्याची समस्या दूर होते
त्वचा खूप मऊ राहते
स्कीन टेक्सचर एकसमान राहतं
सनबर्नमध्ये फायदा होतो
त्वचा मॉइश्चरायझ राहते
त्वचा मुलायम होते आणि चमकते
मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते
मुरुमांची समस्या दूर होते
त्वचेवरील घाण साफ होते
 
कच्चं दूध कापचाच्या साहाय्याने चेहरा, मान, हात आणि पाय या सर्व ठिकाणी लावावे. दूध कोरडे होईपर्यंत राहू द्यावे नंतर पाण्याने स्वच्छ धुवावे.