गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (14:40 IST)

winter skin care Tips : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफडीचा फेस पॅक लावा

थंड हवामानात त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते जेणे करून त्वचा अधिक मऊ  दिसते. या ऋतूमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफडीचा वापर करणे खूप चांगले मानले जाते. खरं तर, कोरफड अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्या नैसर्गिक पद्धतीने दूर करू शकते. 
अशाच काही फेस पॅकबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही हिवाळ्यात सहज बनवू शकता आणि त्वचेची काळजी घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या.हे फेस पॅक कसे बनवायचे.
 
1 कोरफड आणि मधाचा फेसपॅक -
जर तुम्हाला हिवाळ्यात तुमच्या कोरड्या त्वचेमुळे त्रास होत असेल तर तुम्ही कोरफड आणि मधाच्या मदतीने फेस पॅक बनवू शकता.
 
आवश्यक साहित्य-
 2 चमचे कोरफड जेल
एक चमचा मध
एक चमचा गुलाबजल
 
फेस पॅक बनवण्याची पद्धत-
फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम कोरफडीचे पान तोडून त्याचे जेल काढा.
आता या जेलमध्ये मध आणि गुलाबजल मिसळा.
यानंतर चेहरा स्वच्छ केल्यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि अगदी हलक्या हातांनी मसाज करा.
सुमारे 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
 
2 कोरफड जेल आणि टी ट्री ऑइल फेस पॅक-
जर तुमची त्वचा खूप तेलकट किंवा मुरूम असतील तर तुम्ही हा फेस पॅक लावू शकता. 
 
साहित्य-
 2 चमचे कोरफड जेल 
 1 टीस्पून गुलाबजल
टी ट्री ऑयल 2-3 थेंब 
 
कसे वापरायचे -
सर्वप्रथम कोरफडीचे पान तोडून त्याचे जेल काढा.
आता या जेलमध्ये गुलाब पाणी आणि टी ट्री ऑइलचे 2-3 थेंब घाला.
आता हा पॅक 15-20 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा.
हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लावू शकता.
 
3 कोरफड आणि व्हिटॅमिन ई फेस पॅक बनवा-
जर तुम्हाला हिवाळ्यात तुमच्या त्वचेला चांगले पोषण द्यायचे असेल तर व्हिटॅमिन ई ऑइल कॅप्सूलमध्ये कोरफड जेल मिसळा. 
 
आवश्यक साहित्य-
 2 चमचे कोरफड जेल
एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल
 
कसे वापरायचे -
सर्वप्रथम कोरफडीचे पान तोडून त्याचे जेल काढा.
यानंतर भांड्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल मिसळा.
आता चेहरा धुवून हा पॅक लावा.
सुमारे दहा मिनिटांनंतर पाण्याने चेहरा धुवा.
 
Edited By- Priya Dixit