गुरूवार, 29 फेब्रुवारी 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (15:02 IST)

Beauty Tips : बटाट्याने चेहऱ्याची चमक कशी वाढवायची,जाणून घ्या

ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली महागडी उत्पादनेच वापरावीत असे नाही. घरामध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांच्या मदतीने त्वचेच्या समस्यांवर मात करता येते. जर तुम्हाला तुमच्या त्वचेचा काळपटपणा दूर करून पार्लरसारखी चमक मिळवायची असेल, तर अशा परिस्थितीत बटाट्याचा वापर केला जाऊ शकतो. बटाटा त्वचा उजळणारे घटक म्हणून ओळखला जातो. बटाटा  काळपटलेली त्वचा उजळण्यास मदत करते. बटाटा वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 बटाट्याचा फेस मास्क-
बटाट्याच्या फेस मास्कमध्ये असलेले व्हिटॅमिन सी तुमची त्वचा उजळण्यास मदत करते. फेसमास्क बनविण्यासाठी अर्धा बटाटा किसून त्यात 1 चमचा बेसन आणि 1 चमचा लिंबाचा रस घाला. चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर  पाण्याने चेहरा धुवा.
 
2 बटाट्याचा फेस स्क्रब -
त्वचा टोन आणि त्वचा उजळ करण्यासाठी मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी  बटाट्याचा स्क्रब देखील बनवू शकता.हे स्क्रब बनविण्यासाठी अर्धा किसलेला बटाटा अर्धा चमचा ओटमील आणि अर्धा चमचा दुधात मिसळा. या मिश्रणाने 8 ते 10 मिनिटे आपला चेहरा हळूवारपणे स्क्रब करा. दुधामध्ये लैक्टिक ऍसिड असते जे या फेस स्क्रबचा एक्सफोलिएटिंग प्रभाव देखील बळकट करेल तर फॅटी ऍसिड  त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करेल.  
 
3 काळ्या वर्तुळासाठी बटाट्याचा डोळ्यांखालील मास्क-
काळी वर्तुळे नैसर्गिक सौंदर्य हिरावून घेतात  बटाट्याच्या मदतीने या समस्येला दूर करू शकता. डोळ्याखालील मास्क बनविण्यासाठी बटाट्याचे दोन कापकरून त्यावर कोरफडीचा गर लावा. ते स्लाइस डोळ्यावर ठेवा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर ते काढून टाका आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. बटाट्यामुळे गडद  वर्तुळे कमी होतील आणि कोरफड जेल हे डोळ्याची जळजळ शांत करेल.दर दुसऱ्या दिवशी हे उपाय अवलंबवा .
 
 
Edited By - Priya Dixit