बुधवार, 9 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (14:56 IST)

Beauty Tips : त्वचेसाठी योग्य बॉडी वॉश निवडा

बॉडी वॉश त्वचेवर अधिक सौम्य असतात आणि म्हणूनच आजकाल लोक शॉवरच्या वेळी साबणाऐवजी बॉडी वॉश वापरण्यास प्राधान्य देतात. तथापि, बाजारात अनेक प्रकारचे बॉडी वॉश उपलब्ध आहेत आणि त्यामुळे कोणत्याही व्यक्तीसाठी योग्य बॉडी वॉश निवडणे खूप कठीण होते. बॉडी वॉश निवडताना   त्वचेच्या प्रकाराची काळजी घेणे फार महत्वाचे असते.योग्य बॉडी वॉश कसा निवडायचा ते जाणून घ्या.
 
1 कोरड्या त्वचेसाठी बॉडी वॉश-
 त्वचा कोरडी असेल तर तुम्ही जेलऐवजी क्रीमी वॉशचा पर्याय निवडावा. कोरड्या त्वचेसाठी क्रीम वॉश सहसा सौम्य असतो. बॉडी वॉश मधील असे घटक शोधा जे  त्वचा हायड्रेट करेल. जसे की ऑलिव्ह ऑईल, कोरफड किंवा मध.
 
2 निस्तेज त्वचेसाठी बॉडी वॉश-
खराब हवामान असो, खाण्याच्या चुकीच्या सवयी असोत किंवा जीवनसत्त्वांचा अभाव असो, त्वचा कधी ना कधी कोरडी होते.  त्वचा निस्तेज होत आहे आणि तिला फ्रेश करण्याची गरज आहे तेव्हा तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत; प्रथम, पुरेसे पाणी पिण्याची खात्री करा. दुसरे ते एक्सफोलिएट करा. तिसरे, हायड्रेट. त्यामुळे अशा त्वचेसाठी असा बॉडी वॉश निवडावा, जो सौम्य स्क्रब म्हणूनही काम करतो आणि तुमच्या मृत त्वचेच्या पेशी काढून टाकून त्यांना ताजेपणा देतो.
 
3 तेलकट त्वचेसाठी बॉडी वॉश -
जेव्हा तेलकट त्वचेचा विचार केला जातो तेव्हा जास्त तेलामुळे ब्रेकआउट इ. समस्या होतात. अशा परिस्थितीत सौम्य एक्सफोलिएशनसह सौम्य शॉवर जेल वापरावे. मिंट, रास्पबेरी आणि व्हिटॅमिन सी असलेले शॉवर जेल निवडा. तसेच, लॅव्हेंडर सारख्या काही औषधी वनस्पती देखील हार्मोनल पातळी संतुलित करू शकतात आणि अतिरिक्त तेलाचे उत्पादन रोखू शकतात.