शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

इच्छाधारी नागाचे चमत्कारीक मंदिर

- अनिरूद्ध जोशी

WD
श्रद्धधा आणि अंधश्रद्धाच्या या भागात आपण एका चमत्कारीक मंदिराची माहिती घेणार आहोत. तसं पाहायला गेलं तर, नाग आणि उंदिर यांच्यात 36 चा आकडा आहे. परंतु, आम्ही आपल्याला अशा एका आगळ्यावेगळ्या मंदिराविषयी माहिती देत आहोत. या मंदिरातले उंदीर चक्क नागालाच प्रदक्षणा घालतात.

हे मंदिर अत्यंत ऐतिहासीक तर समजले जातेच परंतु याला एक धार्मीक महत्त्वही आहे.हे मंदिर राजा गंधर्वसेन च्या नगरातील अर्थात गंधर्वपुरी येथील अतिप्राचिन मंदिर असून, 'सिंहासन बत्तीसी' कथांमध्येही स्थान देण्यात आले आहे.

WD
या मंदिराच्या विशाल घुमटाखाली एक अशी जागा आहे जिथे एक पीवळ्या रंगाचा एक इच्छाधारी नाग आहे आणि त्याच्या भोवताली अनेक उंदीर त्याला आजही प्रदक्षणा घालतात. का ? हे रहस्य अजुनही कायमच आहे.या रहस्याचा उलगडा अजुनही कोणालाही करता आलेला नाही.

या जागेला गावकरी मंडळी 'चुहापाली' म्हणून ओळखतात. ही जागा किती प्राचिन आहे याची आकडेवारी उपलब्ध नाही, परंतु इथे प्रत्यक्षात नाग किंवा उंदीर दिसत नसताना त्यांचे अस्तित्व केवळ त्यांच्या विष्ठेवरून ओळखता येते. नाग आणि उंदराला येथे प्रत्यक्षात कोणीही पाहिलेले नाही, परंतु तरीही त्यांची उपस्थिती येथे जाणवते.

हे मंदिर आधी विशाल होते, येथे राजा गंधर्वसेनच्या मंदिरा सोबतच इतर आठ भागात हे मंदिर विभागलेले होते.परंतु काळाच्या ओघात आता केवळ गंधर्व राजाचेच मंदिर इथे उभे आहे.

WD
या मंदिराजवळच नागाचे एक वारुळ असल्याची माहिती मंदिराचे पुजारी महेश कुमार शर्मा यांनी दिली. तसेच जवळच नदी असल्याने अनेकदा या भागात नागही दिसतो परंतु उंदीर आतापर्यंत कधीही प्रत्यक्षात कोणीही पाहिले नाही, केवळ त्यांची विष्ठाच आढळून येते. या मंदिराची नियमित साफसफाई केली जाते, तरीही उंदराची विष्ठा या भागात आढळून येते असे शर्मा म्हणाले.

आम्ही लहानपणापासुनच या मंदिराविषयी ऐकत आलो आहोत, आणि पहात आहोत या मंदिरातील नाग पीवळ्या रंगाचा असल्याचे आम्ही ऐकले आहे परंतु गावातील रमेशचंद्र झाला वगळता त्या नागाला अद्याप कोणीही पाहीले नसल्याची माहिती गावातील कमल सोनी आणि केदारसिंह कुशवाह यांनी दिली. 12 ते 15 फुटांचा हा नाग पहाणे अत्यंत शुभ असल्याचे ते मानतात.

WD
मंदिराजवळच घर असल्याने दररोज ब्रह्ममुहूर्तावर मंदिरातील घंटांचा आवाज ऐकू येतो तेव्हा मन प्रसन्न होत असल्याचे सांगतानाच अमावस्या आणि पोर्णिमेला पुजार्‍याने पुजा करण्‍या आधीच कोणीतरी पुजा केल्या प्रमाणे मंदिर स्वच्छ असल्याचे अनेकदा आढळून आल्याचे शेरसिंह, विक्रमसिंह आणि केदारसिंह कुशवाह यांनी स्पष्ट केले.

उंदरांप्रमाणेच सोमवती नदीही या मंदिराला प्रदक्षिणा घालत असल्याचे गावकर्‍यांचे मत आहे.हे मंदिर अतिप्राचिन असून या विषयीच्या अनेक अख्यायीका पुर्वजांकडून ऐकल्याची माहिती गावचे सरपंच विजयसिंह चौहान यांनी दिली.

या मंदिराच्या नुसत्या दर्शनानेच अनेक दु:ख दूर होत असल्याची श्रद्धा आहे या मंदिराचा घुमटही अतिप्राचिन आहे. परंतु मंदिराच्या भिंती बौद्ध काळात बांधण्यात आल्याचे जाणवते. राजा गंधर्वसेन उज्जैनचे राजे विक्रमादित्य आणि भर्तृहरि यांचे वडील होते.

मंदिराची कथा तर आपण ऐकली आता आपल्याला ठरवायचे आहे, की ही सत्यकथा आहे का अंधविश्वास?