शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

इच्छाधारी नागिण

आत्तापर्यत तुम्ही इच्छाधारी नागिण अथवा नागकन्येची विविध रूपे केवळ चित्रपटातच पाहिली असतील. पण कलियुगातही अशा नागकन्या आहेत. आपल्या नाग पतीला मिळविण्यसाठी साधना करणार्‍या अशाच एका नागकन्येची ओळख आम्ही आपल्याला करून देणार आहोत.

माया नावाची ही तरूणी नागकन्या असल्याचा दावा करते. 24 तासाचे हवन करताना आपण नागिणीच्या रूपात असतो असा तिचा दावा आहे. आपल्या तीन बहिणीही इच्छाधारी नागिण असून त्याही आपल्याला मदत करतात, असे तिचे म्हणणे आहे.

WD
माया स्वतःला लहानपणापासूनच विवाहीत समजते. नागाच्या नावाचे कुंकूही लावते. आपल्या पतीशी लवकरच भेट होणार असल्याचेही ती सांगते. आपला पती मृत्युलोकात आपल्या कुटुंबाच्या मोहात अडकला आहे. त्यामुळे त्याच्यातील सर्वशक्ती निकामी झाल्या आहेत, असे तिचे म्हणणे आहे.

यासाठी ती मागच्या जन्मचेही दाखले देते. द्वापार युगात माया खोल दरीत पडली. त्यावेळी एका पीरबाबाने गोपाळ नावाच्या नागाला तिच्या मदतीसाठी पाठवले. तेव्हापासून त्यांचे प्रेमसबंध जुळले. मात्र, लग्न होऊ न शकल्याने तिने आत्महत्या केली होती. तेव्हापासून त्याला प्राप्त करण्यासाठी मी भटकतेय असे तिचे म्हणणे आहे.

WD
नागलोक आणि मृत्युलोकाच्या अशा चित्रविचीत्र गोष्टी सांगणारी ही इच्छाधारी नागिण मध्य प्रदेशातील बडनगरमधील एका आश्रमात रहाते. तिथले गावकरीही तिला महामाया भगवतीचे रूप मानून तिची पुजा करतात.