मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (13:10 IST)

चौरस्त्यावरुन निघताना वाटेत असे काही दिसत असल्यास या गोष्टींची काळजी घ्या

चौक ओलांडताना खूप काळजी घेतली पाहिजे असे घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे अनेकदा ऐकले असेल. चौरस्त्याबद्दल काही गोष्टी लोकप्रिय आहेत, याचे कारण काय आहे, ज्यामुळे आपण इतके सतर्क राहतो, याचा विचार करा. 
 
चौरस्ता राहु दर्शवतो. काही परिमाणे सोडली तर इतर सर्व आयाम अत्यंत नकारात्मक आहे.
 
राहु एक प्रकारे भ्रम आहे, राहु माया आहे. आपल्या भ्रमित करण्यात राहु शातिर असतो. जेव्हा वेळ वाईट असते तेव्हा मती म्हणजे मेंदू योग्यरीत्या चालवणे आवश्यक असतं. आणि राहु मती भ्रमित करतो. म्हणून तर म्हणतात विनाश काले विपरीत बुद्धि. 
 
विष्णु पुराणात जीवन सुखी करण्यासाठी नियम सांगण्यात आले आहे. या नियमांचे पालन करुन भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मीसह सर्व देवतांना प्रसन्न करता येतं.
 
-रस्त्यावरुन जाताना अनेकदा नकारात्मक वस्तू दिसतात, त्या ओलांडू नये.
 
-काही वस्तू अशा असतात ज्यांचा औरा नेगेटिव एनर्जी देतो. अशात एखादी व्यक्ती त्या औरामध्ये प्रवेश करते किंवा त्यावरुन निघते तर त्यांची सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते म्हणूनच रस्त्यावर किंवा चौरस्त्यावर नीट पाहून चालण्याचा सल्ला दिला जातो.
 
-शास्त्रांप्रमाणे मृत प्राण्यांच्या स्पर्शामुळे देखील व्यक्ती अपवित्र होतो अशात त्याला स्नान करावं लागतं. तसेच एखाद्या शव यात्रेत जाऊन आल्यावर देखील स्नान करणे गरजेचं असतं.
 
-अनेक वेळा वाटेत अपघात होऊन जनावरांचा मृत्यू होतो, त्यानंतर त्यांचा मृतदेह वाटेतच पडून राहतो. लक्षात ठेवा की, तुमचे वाहन त्यांच्यावरुन कधीही काढू नये. एवढेच नाही तर त्यांना बघितल्यानेही त्याची नकारात्मक ऊर्जेमुळे तुमचे मन खराब होतं. कुठेही स्पर्श झाला तर घरी जाऊन आंघोळ करावी.
 
-केस देखील अपवित्र मानले जातात. वाटेत केस पडलेले असतील तर ते ओलांडू नये. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्वतःची लांबी असेल तेवढा अंतर राखावा.
 
-वाटेत काटे दिसले तर दुरूनच निघावे. कारण अनेकांना चौकात किंवा वाटेत काटे ठेवण्याचा सल्ला दिला जातो, ज्याने त्यांच्या आयुष्यातील काटे दूर होतात. त्यामुळे इतर कोणाच्या आयुष्यातील काट्यांपासून दूर राहिले पाहिजे.
 
-कोणत्याही प्रकारची राख, जळलेली लाकूड किंवा इतर कोणतीही वस्तू जी जळली आहे ती चुकुनही ओलांडू नये. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा प्रबळ होते आणि आरोग्यही बिघडू शकते. 
 
-वाहन चालवताना लक्षात ठेवा की लिंबू कधीही चिरडू नये किंवा ओलांडू नये. अनेकदा चौकाचौकात लिंबू ठेवलेले दिसतात, असे वाटते की कोणी खास इथे ठेवले असेल किंवा पूजा केली असेल तर चौकाच्या काठावरुन निघून जावे. काहीवेळा अन्नपदार्थही पानात ठेवलेले दिसतात, ते देखील ओलांडणे किंवा पाहणे टाळावे.