शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By अय्यनाथन्|

कोणत्‍याही आधाराविना उभारलेले मंदिर

WD
कावेरी नदीच्‍या तीरावर वसलेल्‍या एका भव्‍य मंदिराची सैर आम्ही आपल्याला घडविणार आहोत. तंजावर येथील सुमारे 216 फूट उंचीचे हे 'मोठे मंदिर' म्‍हणून प्रसिध्‍द आहे. कोणत्‍याही आधाराविना एवढ्या भव्‍य मंदिराची उभारणी करण्‍यात आली, हेच या मंदिराचे वैशिष्‍टय हे भव्‍य मंदिर केवळ श्रध्‍देचेच नव्‍हे तर प्राचीन स्‍थापत्‍यशास्‍त्राचेही एक मोठं उदाहरण आहे.

इसवी सन पूर्व 1003 ते 1009 या काळात चोला येथील महाराज राजारंजन यांनी या मंदिराची निर्मिती केली असावी. मागील सुमारे 1000 वर्षांपासून हे भव्‍य मंदिर आपल्‍या संस्‍कृतीचं प्रतीक म्‍हणून अढळ आहे.

WD
मंदिराच्‍या गाभा-यात भव्‍य आणि आकर्षक शिवलिंगाची स्‍थापना करण्‍यात आली असून त्‍यावर पंचमुखी शेषनागाने फणा धरला आहे. 6 फूट अंतरावर मंदिराच्‍या दोन्‍ही बाजूस भव्‍य भिंतींची उभारणी करण्‍यात आली आहे. त्‍यातील एका भिंतीवर एक मोठी आकृती असून तिला विमान असे म्‍हटले जाते.

एकावर एक अशा 14 पोकळ आयतांनी बनविलेली ही वास्‍तू आहे. 14 व्‍या आयतांवर सुमारे 88 टन वजनाचा भव्‍य घुमट आहे. त्‍यामुळेच मंदिराची इमारत भक्‍कम झाली आहे. मंदिरावर 12 फूट उंचीच्‍या कलशाची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

WD
भव्‍य मंदिरात वापरण्‍यात आलेले पोकळ दगड आपल्‍या प्राचीन स्‍थापत्‍य कलेची महती सांगतात. या आयताकृती वास्‍तूचे आध्यात्मिकदृष्ट्याही मोठे महत्‍व आहे. येथे भगवान शंकराची पूजा एका शिवलिंगाच्‍या रूपाने केली जाते. हे ईश्‍वराचे अरूप असल्‍याचीही धारणा आहे.

मंदिराची वास्‍तू पाहिल्‍यानंतर तिच्या निर्मितीविषयी खूप आश्चर्य वाटतं. कन्याकुमारीत असलेली 133 फूट उंचीची तिरूवल्लुवराची मूर्ती ही सुद्धा अशाच प्रकारे तयार करण्यात आली आहे. 2004 मध्‍ये त्‍सुनामी लाटांमध्‍येही ही मूर्ती अढळ राहिली.

तंजावरच्या मंदिरात महादेवाचे वाहन असलेल्‍या नंदीची सुमारे 12 फूट लांब आणि 19 फूट रुंदीची मूर्ती आहे. 16 व्‍या शतकात विजयनगर साम्राज्‍याच्‍या काळात तिची स्‍थापना करण्‍यात आली.

या मंदिराची महती जगानेही मान्य केली असून यूनेस्कोने तिला जागतिक वारसा घोषित केले आहे. आता मंदिराची देखभाल भारतीय पुरातत्‍व विभागाकडून केली जाते.