चोरवडला भरणारी भूतांची जत्रा
नरेंद्र राठोड खरा भारत खेड्यात रहातो असे म्हणतात. खेड्यांचा आणि जत्रेचा संबंध तर अतूट आहे. जत्रा भरत नसलेले गाव शोधूनही सापडणार नाही. श्रद्धा व अंधश्रद्धाच्या या भागात आम्ही आपल्याला एका आगळ्या वेगळ्या जत्रेत घेऊन जात आहोत. या जत्रेत पाळणे आहेत. खेळण्याची, खाण्यापिण्याची दुकाने आहेत. रहाट पाळणे आहेत. पण या बरोबरच भूतदेखिल आहेत. वाचून धक्का बसला असेल. पण हे खरं आहे. आम्ही आपणास घेऊन जातोय जळगाव जिल्ह्यातील चौखड या गावी. या गावात भरणारी भूतांची जत्रा परिसरात खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी दत्तजयंतीच्या दिवशी ही भूतांची जत्रा भरते. हे ऐकून आम्ही त्या दिवशी चौरवडला गेलो. गावाजवळ पोहचल्याबरोबर झुंडीने येणारे लोक दिसू लागले. यात झुंडीत काही लोक चित्रविचित्र हालचाली करत होते. बरळत होते. पाहतानाच ते मनोरूग्ण असावेत असे वाटत होते.