मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

देवीला घालतात रक्ताचा अभिषेक

प्रथापन

WDWD
परमेश्वराच्या पूजेचे अनेक मार्ग आहेत. पण शरीरावर काटेरी फांद्या बांधून रक्ताळलेल्या शरीराने देवीची पूजा करणार्‍या मंडळींविषयी तुम्हाला माहिती आहे? द्रविडी संस्कृतीत आजही अशी एक पूजा पद्धती आहे. केरळमध्ये ‘अडवी’ नावाच्या प्रथेअंतर्गत लोक कालीमातेची अशी पूजा करतात.

केरळची राजधानी तिरूवनंतपुरमपासून शंभर किलोमीटरवर असलेल्या ‘कुरमपला देवीच्या मंदिरात’ ही प्रथा दर पाच वर्षांनी पाळली जाते. ही प्रथा सुरू होण्यामागेही एक कहाणी आहे. अडवी वेलन नावाचा पूजारी अडवी देवीचा भक्त होता.

एकदा वेलन पूजा करण्यासाठी मंदिराजवळून जात होता. त्याचवेळी देवीने त्याला आपल्याकडील सर्व विद्या, शक्ती दिली. पुढे गावकर्‍यांना ही बाब कळाल्यानंतर या शक्तींची आराधना करण्यासाठी ते नरबळी द्यायला लागले. पुढे या प्रथेचे नावच अडवी प्रथा असे पडून गेले.
  देवीने त्याला आपल्याकडील सर्व विद्या, शक्ती दिली. पुढे गावकर्‍यांना ही बाब कळाल्यानंतर या शक्तींची आराधना करण्यासाठी ते नरबळी द्यायला लागले.      

आज बळी दिला जात नसला तरीही ही प्रथा अंगावर काटे आणणारी आहे. भाविक काटेरी फांद्या आपल्या अंगाला बांधून जमिनीवर लोळण घेतात. आणि देवीला आपले रक्त अर्पण करतात. पणयानीच्या नवव्या दिवशी गावकरी मंदिरात जातात आणि काटेरी फांद्या, नारळाच्या फांद्या अंगाला बांधतात. पणयानी संध्याकाळी सात वाजता सुरू होते. मध्यरात्री मंदिराचे मुख्य पुजारी भाविकांना प्रसाद वाटतात.

हा प्रसाद मिळाल्यानंतर भाविक विविध ठिकाणांहून काटेरी फांद्या एकत्रित करतात. त्यानंतर त्या फांद्या आपल्या अंगाला बांधून मंदिराला प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा केवळ उत्तर दिशेनेच केली जाते.

प्रदक्षिणेनंतर काटे काढून टाकल
WDWD
जातात आणि शरीरातून येणारे रक्त एकत्रित करून काली मातेची पूजा केली जाते. अगदी नरबळीची आठवण यावी अशी ही प्रथा आहे. भाविकांना मात्र, या प्रथेत काहीही हिंस्त्र असल्याचे वाटत नाही. आपल्याला कोणताही त्रास होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रथेविषयी काय वाटते? आम्हाला जरूर कळवा.

(व्हिडिओ व चित्र पणयानी.कॉम)