शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

भूतबाधा उतरवणारं झाड

WD
एखाद्या झाडावर चढल्यानंतर किंवा चिखलात डुबकी मारल्यावर भूतबाधा खरंच दूर होते का? मुळात असे काही असते का? तुम्हाला हे प्रश्न जरा विचित्र वाटतील पण, आम्ही आपल्याला अशाच एका भूतबाधा उतरवणार्‍या झाडाची माहिती देणार आहोत.

मध्य प्रदेशातील उज्जैन ‍जिल्ह्यातील बडनगर येथील अलोट या गावात असे एक झाड आहे, या झाडाच्या सानिध्या‍त आल्यानंतर ज्यांना भूतबाधा झाली असेल अशा लोकांची भूतबाधा उतरते असे येथे येणार्‍यांची धारणा आहे.

गावातील एका दर्ग्याजवळ हे झाड आहे, भूतबाधा झालेल्या लोकांना गावात आणल्यानंतर ते स्वत: या दर्ग्याजवळ येतात आणि आपल्याला यातुन मुक्त करावे अशी विनंती करतात.

WD
त्यांना बाबांचा आदेश मिळाल्यानंतर भूतबाधित महिला येथील चिखलात आंघोळ करतात आणि झाडावर चढून विचित्र पद्धतीने आपली व्यथा त्या झाडाला सांगतात. यासंदर्भात संतोष नावाच्या एका कथित भूतबाधिताशी आम्ही बोललो. मी माझ्या समस्येविषयी अनेक डॉक्टरांना भेटलो. परंतु त्यांच्या औषधातून कोणताही फरक न पडल्याने आपण या दर्ग्याला शरण आल्याचे संतोषने स्पष्ट केले.

WD
या झाडावर चढणे तितकेसे सोपे नाही. परंतु, येथे येणार्‍या भूतबाधित महिला बाबांच्या आदेशावरून त्यावर चढतात. यानंतर या दर्ग्यातील काझी त्या ‍महिलेच्या केसांना एक लिंबू बांधून, त्याच झाडाला केस आणि लिंबासह एक खिळा ठोकतात, त्या महिलेच्या केसांचा तेवढा भाग नंतर कापून तिला त्यातून मुक्त केले जाते आणि यानंतर त्या महिलेला भूतबाधेतून मुक्ती मिळते अशी येथे येणार्‍यांचे ठाम मत आहे. या झाडावर चढल्यानंतर भूतबाधा दूर होते अशी अनेकांची धारणा असल्याने येथे येणार्‍यांची संख्या मोठी आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन ही परंपरा सुरुच असल्याचे येथील रहिवासी सांगतात.

आपल्याला भूतबाधा झाली असल्याचे सांगत येथे अनेक जण येतात. आपल्याला येथे आल्यानंतर चांगले वाटल्याचेही अनेकांचे मत आहे. येथे बाबांच्या दर्ग्यावर दोरा बांधून नवसही केला जातो.