मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जानेवारी 2020 (10:32 IST)

अ‍ॅक्टिव्हा आली नव्या रुपात, Honda Activa 6G झाली लाँच

Honda Activa 6G ही स्कुटर कंपनीने दोन व्हेरिअंट्समध्ये(स्टँडर्ड आणि डीलक्स) लाँच केली आहे. नव्या स्कुटरमध्ये अपडेटेड इंजिन, अधिक मायलेज आणि अनेक नवीन फीचर मिळतील. अ‍ॅक्टिव्हा 6जीमध्ये नवीन फ्रंट ऐप्रन आणि रिवाइज्ड एलईडी हेडलँम्पसह मागील बाजूलाही काही बदल केलेत.  एकूण सहा रंगांचे पर्याय नव्या अ‍ॅक्टिव्हासाठी उपलब्ध आहेत.
 
नव्या अ‍ॅक्टिव्हामध्ये सेमी-डिजिटल इंस्ट्रुमेंट कन्सोल, रिमोट हॅच ओपनिंगसह मल्टी फंक्शन-की आणि अन्य फीचर्सचा समावेश आहे. यामध्ये नवीन सायलेंट-स्टार्ट ACG मोटार दिली आहे.  अ‍ॅक्टिव्हा 5जीच्या तुलनेत नव्या मॉडेलचं सीट लांब आहे आणि व्हिलबेस देखील अधिक आहे.
 
नव्या होंडा अ‍ॅक्टिव्हामध्ये बीएस-6 मानकांसह 109cc इंजिन आहे. इंजिन अपडेट करण्याव्यतिरिक्त कंपनीने इंजिनमध्ये फ्युअल इंजेक्शन सिस्टिम दिली आहे. नवीन इंजिन 8,000 rpm वर 7.68 bhp ची पावर आणि 5,250 rpm वर 8.79 Nm पीक टॉर्क निर्माण करते. जुन्या मॉडेलपेक्षा नव्या अ‍ॅक्टिव्हामध्ये 10 टक्के अधिक मायलेज मिळेल.