सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पहिल्यांदाच कॅम्पस प्लेसमेंटसाठी अॅपल भारतात

अॅपल पहिल्यांदाच भारतात कॅम्पस प्लेसमेंटसाठी येणार आहे. अॅपल आयआयटी हैदराबादमध्ये कॅम्पस प्लेसमेंटसाठी येत आहेत. भारतातली ही पहिलीच संस्था आहे, ज्यामधून विद्यार्थ्यांना अॅपल नोकरीची संधी देणार आहे.
 
आयआयटी हैदराबादचे प्लेसमेंट प्रमुख देवीप्रसाद यांनी याबाबत माहिती दिली आहे. अॅपल येणार असल्यामुळे आनंद आहे. अॅपलला कशा प्रकारचे विद्यार्थ्यांचा शोध आहे, हे सांगता येणार नाही. मात्र संस्थेतील विद्यार्थ्यांना ही आपली बौद्धिक क्षमता दाखवण्याची सर्वात चांगली संधी आहे, असं देवीप्रसाद यांनी सांगितलं.