मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (14:45 IST)

ऑटो एक्सपोमध्ये सादर केले एसयूवी एसपी

- संदीपसिंह सिसोदिया

दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑटो एक्‍स्पोमध्ये हयुंदाई इंडिया ही कार निर्माता कंपनी सहभागी होणार आहे. भारतात कंपनीकडून कारचे उत्पादन आणि विक्रीला 20 वर्षे पूर्ण झाल्याने कंपनीसाठी हे वर्षे महत्त्वपूर्ण आहे. दिल्ली ऑटो एक्‍स्पोमध्ये कंपनीकडून 15 नवीन कार मॉडेल आणि तंत्रज्ञानाची मांडणी करण्यात येणार आहे.
 
कंपनीकडून एक्‍सपिरियन्स हयुंदाई या नावाने आपल्याकडील पर्यावरणपूरक, मोबिलिटी आणि कनेक्‍टेड तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात येईल. कंपनीचा आयओनिक हा ब्रॅन्ड यावेळी प्रदर्शित केला जाणार असून यामध्ये हायब्रिड, प्लग इन आणि इलेक्‍ट्रिक या तिन्ही प्रकारांतील मॉडेल सादर करण्यात येईल. या तिन्ही प्रकारांतून सेवा देणारी ही जगातील पहिली कार आहे.
कंपनीचा एनफ हा एक ब्रॅन्ड असून यामध्ये उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला असतो. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची कंपनीकडून निर्मिती करण्यात येत असून जागतिक पातळीवरील रोबोटिक्‍स सादर करण्यात येईल. कंपनीकडून कोना ही कॉम्पॅक्‍ट यूएसव्ही प्रकारातील मॉडेल प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
 
सेफ्टीसाठी कारमध्ये ठेवण्यात आलेले आहे हे फीचर्स -
कारमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (ईबीडी) ब्रेक एसिस्ट
- इमरजेंसी स्टॉप सिग्नल
- इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल एंड व्हीकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट (वीएसएम)
- ऑटोनोमस इमरजेंसी ब्रेकिंग (एईबी)
- हिल स्टार्ट एसिस्ट कंट्रोल
- इंटेलिजेंट स्टॉप एंड गो
- गियर शिफ्ट इंटीगेटर
- रिवसिंग कैमरा सिस्टम विथ डायनॉमिक गाइडलाइनसोबत  
 
कारच्या सुरक्षेसाठी देखील आहे काही खास फीचर्स -
- एंटी थॅफ्ट अलार्म सिस्टम
- लॉकिंग व्हील्स नट्‍स
- स्पीड सेंसिंग ऑटो डोर लॉकिंग डोर