1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

कांदा निर्यातीवर बंदी

ban on onion export
सणासुदीच्या काळात गगनाला भिडू पाहणारे कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी कांदा निर्यातीवर बंदी घातली आणि कांद्याचा साठा करण्यावर मर्यादा आणली. महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
 
देशात कांद्याची उपलब्धता वाढून भाव कमी व्हावेत या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं ग्राहक मंत्रालयाने स्पष्ट केलं. केंद्राने 50 हजार टन कांद्याचा राखीव साठाही उपलब्ध करून दिला आहे.
 
कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने किरकोळ दुकानदारांना 100 क्विंटल तर घाऊक विक्रेत्यांना 500 क्विंटल कांद्याचा साठा करण्याची मर्यादा घालून दिली असल्याचं ग्राहक मंत्रालयाने स्पष्ट केलं.