रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 3 मार्च 2018 (11:10 IST)

तीन मोठ्या बँकांनी केली कर्जावरील व्याजदरात वाढ

भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि आयसीआयसीआय बँक या देशातील तीन मोठ्या बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे नवे कर्ज घेणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. हे व्याजदर १ मार्चपासून लागू करण्यात आले आहेत. बँकांच्या या निर्णयामुळे गृहकर्ज महागणार असून त्यामुळे इएमआयमध्येही वाढ होणार आहे.       
 
एसबीआयने एप्रिल २०१६ नंतर पहिल्यांदाच आपल्या व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. या बँकेच्या एका वर्षाच्या कर्जावर एमसीएलआर ७.९५ टक्के इतका होता. यामध्ये ०.२० टक्के वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर सहा महिन्यांच्या कर्जावर एमसीएलआर ०.१० टक्के वाढवून ८ टक्के ठेवण्यात आला आहे. ३ वर्षांच्या कालावधीसाठी व्याजदरांत ०.२५ टक्के वाढ करण्यात आली असून तो ८.३५ टक्के इतका करण्यात आला आहे. एसबीआयप्रमाणेच आयसीआयसीआय आणि पीएनबी बँकेने देखील एमसीएलआरमध्ये १५ बेसिस पाँईंटने वाढ केली आहे.