शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (11:40 IST)

बँक कर्मचार्‍यांचा 22 ऑग्सटला संप

बँकांच्या विलीनीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी तसेच बँक कर्मचाऱ्यांच्या ११ व्या वेतनकराराची पूर्तता वेळेवर व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी ‘युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियन्स’च्या ( यूबीएफयू) माध्यमातून २२ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे, अशी माहिती नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्सतर्फे (एनओबीडब्ल्यू) पत्रकार परिषदेत देण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री उपेंद्र कुमार आणि अध्यक्ष रामनाथ किणी आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी पी. पी. सिंह, के. आर. पूंजा आणि मधू सातवळेकर आदी उपस्थित होते. ‘सरकारी बँकांच्या विलीनीकरणाची आवश्यकता नसताना सरकार विनाकारण हा अजेंडा राबवत आहे.