सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात
नवी दिल्ली : नवीन महिन्याची सुरुवात होताच एक आनंदाची बातमी आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला आहे. देशभरात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. एलपीजी सिलिंडरची किंमत 171.50 रुपयांनी कमी झाली आहे. नवे दर आजपासून म्हणजेच 1 मेपासून लागू झाले आहेत. याबाबतची माहिती ऑइल मार्केटिंग कंपनीने सकाळी जारी केली. इंडियन ऑइलच्या वेबसाईटवर नवीन किमतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ही कपात केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. घरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजपासून लागू होणार्या नवीन दरांनंतर दिल्ली ते पाटणापर्यंत सिलिंडरच्या किमती काय असतील याची संपूर्ण यादी येथे वाचा.
देशातील महानगरांमध्ये एलपीजी सिलिंडरचे दर
शहरांचे नाव व्यावसायिक सिलेंडर घरगुती सिलेंडर
दिल्ली रु. 1856.50 रु. 1103
मुंबई रु. 1808.50 रु. 1112.50
कोलकाता रु. 1960.50 रु. 1129
चेन्नई रु. 2021.50 रु. 1118.50