1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतना एवढा बोनस

railway bonus
केंद्र सरकारने दिवाळीनिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतका बोनस दिला जाणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे ११ लाख कर्माचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. दिवाळीला अजून एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना रेल्वे मंत्रालयाकडून आपल्या कर्मचाऱ्यांना खूशखबर देण्यात आली आहे. 

सलग सहाव्या वर्षी पहिल्यांदाच रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस दिला जात असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती देताना सांगितले.