1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 2 सप्टेंबर 2019 (09:39 IST)

GST संकलनात घट

Reduction in GST compilation
ऑगस्ट महिन्यातील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलन एक लाख कोटी रुपयांखाली घसरलं असून मंदीसदृश वातावरणात सरकारी महसुलातही घट होत आहे.
 
ऑगस्ट महिन्यातील GST संकलन 98 हजार 202 कोटी रुपये नोंदवले गेले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील संकलनाच्या तुलनेत ते 4.51 टक्के अधिक असले, तरी मासिक एक लाख कोटी रुपयांच्या सरकारी उद्दिष्टापेक्षा ते कमीच भरले.
 
दरम्यान, बँकांच्या विलीनीकरणामुळे एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नसल्याचं स्पष्टीकरणही सीतारामन यांनी दिलं आहे. बँकांच्या विलीनीकरणामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील, या भीतीमुळे कर्मचाऱ्यांच्या संघटना या निर्णयाला विरोध करत असल्याच्या पाश्र्वभूमीवर सीतारामन बोलत होत्या. ही बातमी लोकसत्ताने प्रकाशित केली आहे.