शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

Royal Enfield ने लॉन्च केली स्वस्त Classic 350

Royal Enfield ने आपल्या सर्वात प्रसिद्ध बाइक Classic 350 चा नवीन आणि स्वस्त मॉडल लॉन्च केला आहे. Royal Enfield Classic 350 S नावाने बाजार प्रस्तुत करण्यात आल्या या बाइकची किंमत मात्र 1.45 लाख रुपये आहे. स्टॅंडर्ड क्लासिक 350 व्हर्जनपेक्षा तब्बल 9 हजार स्वस्त या मॉडलमध्ये ब्लॅक आणि मर्करी सिल्वर रंगाचा पर्याय मिळेल.
 
फीचर्स
नवीन क्लासिक 350 एस आता कमी किमतीत असून कंपनीने यात बदल देखील केले आहे. किंमत कमी ठेवण्यासाठी यात सिंगल चॅनल एबीएस देण्यात आले आहे, जेव्हाकी स्टॅंडर्ड क्लासिक 350 व्हर्जनमध्ये ड्यूल-चॅनल एबीएसची सुविधा मिळणार. या व्यतिरिक्त बाइकमध्ये इंजन आणि व्हील्सला काळा रंग देण्यात आला आहे. जेव्हाकी स्टॅंडर्ड क्लासिक 350 व्हर्जनमध्ये अनेक जागी क्रोम फिनिश आहे.
 
नवीन बाइकच्या फ्यूल टँकवर कंपनी लोगो वेगळ्या शैलीत आहे. स्टॅंडर्ड क्लासिक 350 मध्ये टँकवर ग्रिप्ससह खास डिझाइनसह लोगो आहे.
 
बाइकच्या इंजनमध्ये कोणत्याही प्रकाराचा बदल करण्यात आलेला नाही. यात 346cc सिंगल-सिलिंडर, एयर-कूल्ड इंजन देण्यात आले आहे. हे इंजन 19.8hp चं पावर आणि 28Nm टॉर्क जनरेट करतं. इंजन 5-स्पीड ट्रांसमिशनने लैस आहे. नवीन क्लासिक 350 एस सध्या केवळ तमिलनाडु आणि केरळ येथे उपलब्ध असून देशभरात याची  विक्री सुरू होण्याची तारीख अजून स्पष्ट झालेले नाही.