गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 20 नोव्हेंबर 2019 (13:18 IST)

Maruti Suzuki च्या या चार Cars वर एक लाख रुपयांपर्यंतची सूट

आपण मारुती सुझुकीची कार खरेदी करण्यास इच्छुक असल्यास ही सोनेरी संधी आहे. भारतीय ऑटोमोबाइल कंपनी मारुती सुझुकी, Maruti Suzuki Ciaz, Maruti Suzuki S-Cross, Maruti Suzuki Ignis आणि Maruti Suzuki Baleno या गाड्यांवर बंपर सूट देत आहे.
 
Maruti Suzuki Ciaz
मारुती सुझुकीची Ciaz कार 2014 मध्ये लॉन्च झाली होती. ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कंपनी आपल्या सिग्मा आणि डेल्टा ट्रिम्सच्या पेट्रोल मॅनुअल कॉम्बोवर 70,000 रुपये, आणि इतर टॉप दोन वेरिएंटवर 60,000 रुपयांची सूट देत आहे. या कारच्या 1.5 लीटर डिझेल इंजिनावर 70,000 रुपये जेव्हाकि 1.3 लीटर इंजिन असलेल्या कारवर एक लाख रुपये पर्यंतची सूट मिळत आहे.
 
Maruti Suzuki S-Cross
मारुती सुझुकीची S-Cross मध्ये 1.3 डिझेल इंजिन असून या कारवर 95,000 रुपये पर्यंतची सूट मिळत आहे.
 
Maruti Suzuki Ignis
मारुती सुझुकीची Ignis कार 1.2 लीटर पेट्रोल इंजिनामध्ये उपलब्ध आहे. या कारवर कंपनी 60,000 रुपये पर्यंतची सूट देत आहे.
 
Maruti Suzuki Baleno 
मारुती सुझुकीची Baleno पेट्रोल आणि डिझेल इंजिनामध्ये उपलब्ध आहे. यावर कंपनी कॉर्पोरेटसह एक्सचेंज डिस्काउंट देखील देत आहे. कंपनी हॅचबॅक बीएस-6 पेट्रोल इंजिन ट्रिमवर 40,000 आणि बीएस-4 वर 55,000 रुपये पर्यंतची सूट देत आहे. याच्या डिझेल इंजिनावर 50,000 हजार रुपये पर्यंतची सूट मिळत आहे.