गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

CCD चे मालक व्ही. जी.सिद्धार्थ बेपत्ता, मोबाइल स्वीच ऑफ

CCD owner VG Siddhartha missing
प्रसिद्ध कॅफे चेन CCD (कॅफे कॉफी डे) चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता आहेत. सिद्धार्थ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम कृष्णा यांचे जावई आहेत. सिद्धार्थ सोमवारी कारने सक्लेश्पूर प्रवास करत होते परंतू अचानक त्यांनी आपल्या ड्रायवरला मंगळुरूकडे वळण्याचे सांगितले आणि येथील नेत्रावती नदीच्या परिसरात ते आले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले.
 
सिद्धार्थ सोमवारी संध्याकाळी जवळपास सहा वाजेच्या सुमारास नेत्रावती नदीच्या पुलाजवळ कारमधून उतरले. त्यांनी ड्रायव्हरला येतो असे सांगितले. ड्रायव्हरने दोन तास त्यांची वाट पाहिली पण सिद्धार्थ परतले नाहीत. त्यांचा फोनदेखील बंद आहे. त्यामुळे ड्रायव्हरने सिद्धार्थ यांच्या घरी फोन करून ते बेपत्ता असल्याची माहिती दिली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम वेगाने सुरू केली आहे.
 
भाजपा खासदार शोभा करंदलाजे यांनी गृहमंत्री अमित शाह आणि रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांना एक पत्र सोपावून बेपत्ता सिद्धार्थ यांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकाराकडून मदत मागितली आहे. 
 
सूत्रांप्रमाणे त्यांनी ड्रायवरला त्यांच्या येईपर्यंत थांबायला सांगितले होते. दोन तासा झाल्यावर देखील ते परतले नाही तर ड्रायवरने पोलिसांशी संपर्क करुन त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. नंतर 200 हून अधिक पोलिस आणि गोताखोरांच्या 25 नौकांच्या मदतीने शोध सुरु आहे. यासाठी कुत्र्यांचीही मदत घेतली जात आहे.