गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मे 2020 (09:07 IST)

येस बँकेचे संस्थापकराणा कपूर यांच्याविरुद्ध मनी लाँडरिंग प्रकरणी आरोपपत्र

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने मुंबईच्या विशेष न्यायालयात मनी लाँडरिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं. काही कंपन्यांना नियम डावलून आणि लाच घेऊन कर्ज दिल्याप्रकरणी कपूर ८ मार्च पासून सक्त वसुली संचालनालयाच्या ताब्यात आहेत. या व्यवहारात कपूर यांनी ४ हजार ३०० कोटी रुपयांचा फायदा उकळल्याचा आरोप ईडीने लावला आहे.
 
दरम्यान,येस बँक घोटाळ्यातले संशयित कपिल आणि दिलीप वाधवान यांच्या महाबळेश्वर इथल्या बंगल्याची झडती आज सीबीआयनं घेतली. वाधवान बंधु २३ जणांसोबत लॉकडाऊनच्या काळात गृह विभागाच्या प्रधान सचिवांचं पत्र घेऊन महाबळेश्वरला गेले होते.