1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 20 जुलै 2020 (20:20 IST)

Ducati ची नवी कोरी Panigale V2 भारतात लाँच

स्पोर्ट बाइक तयार करणाऱ्या डुकाटी (Ducati) ने सोमवारी आपली नवी कोरी पॅनिगेल व्ही 2 (Panigale V2) भारतात लाँच केली आहे. Panigale V2 ही बीएस-6 मानकासह लाँच करण्यात आली आहे.
 
नवी दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू, कोची, कोलकाता आणि चेन्नईमध्ये ही शानदार बाइक 1 लाख रुपये देऊन बूक करता येणार आहे.लवकरच ही बाइक भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती डुकाटी कंपनीचे भारतात व्यवस्थपकीय काम पाहणारे विपुल चंद्र यांनी दिली.
 
नवी Panigale V2 ही एक कॉम्पक्ट बाइक आहे. ही बाइक 959 पॅनिगेलची जागा घेणार आहे. या बाइकची किंमत 15.30 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे नव्या Panigale V2 ची किंमतही 95 हजार ते 1.2 लाख जास्त असणार आहे.
 
अलीकडे डुकातीने Rosso livery लाँच केली होती. ही बाइक भारतात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.Panigale V2 मध्ये 955cc, 90 डिग्री V-twin इंजिन दिले आहे. जे 155 PS पॉवर आणि 104Nm इतका टॉर्क जेनरेट करतो. 
 
डुकाटीने दावा केला आहे की, V2 5,500rpm वर 60 टक्के जास्त टॉर्क जनरेट करेल.भारतात Ducati ची Panigale V2 ही पहिली BS6 बाइक आहे.